Thursday, April 30, 2020

कर्तव्याचे पालन करता पोलिस निरीक्षाकाचे रसत्याच्या कडेला फुटपाठवर बसून रोजा इफ्तार.



कर्तव्याचे पालन करता पोलिस निरीक्षाकाचे रसत्याच्या कडेला फुटपाठवर बसून रोजा इफ्तार.

पुणे : करोना ने देशात हल्ला केल्यानंतर त्याला पळवून लावण्यासाठी दिवस रात्र सरकारी अधिकारी कर्मचारी महेनत घेत आहे .नागरिकांना घरात बसून करोना विरोधात लढायचे असून तसा काही ठिकाणी नागरिक सहकार्य करत नसल्याने पोलिसांना नाईलाजाने त्यांना शिक्षा करावी लागत आहे.
नागरिकांनी जरा या अधिकारी कर्मचारीबद्दल हि विचार करायला हवा आहे कि हे लोक आपले जीव धोक्यात घालून तुमच्यासाठी रस्त्यावर आहे .
करोना संक्रमितांचा आकडा कमी करण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी हि दिवसरात्र प्रयत्न करत आहेत.
कर्तव्य पहिले नंतर धर्म असाच एक आदर्श घालणारा अनुभव पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यातील पोलिस निरीक्षककडून पहायला मिळाला.काल वानवडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सय्यद नगर ते श्रीराम चौक येथे पोलिस मार्च काढण्यात आला होता मार्च संपेपर्यंत रोजा इफ्ताराचा वेळ झाला होता .पोलीस ठाण्यापर्यंत जाण्या एवढं वेळ नसल्याने हडपसर सय्यदनगर रेल्वे गेटजवळच फुटपाथवर बसून वानवडीचे पोलिस निरीक्षक ( गुन्हे) सलीम चाऊस यांनी रोजा इफ्तार केला
फुटपाथवर रोजा इफ्तार करून कर्तव्यदक्षपणा दाखवला . कर्तव्याला प्राधान्य दिल्याने त्यांचे सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात नवीन कोविड - 19 वर नियंत्रण



अहमदनगर जिल्ह्यात नवीन कोविड - 19  वर नियंत्रण,

आलमगीर येथील दोन रुग्ण घरी सोडनार, तीन दिवसात एक ही नवीन रुग्ण जिल्ह्यात नाही


अहमदनगर जिल्ह्यात मागील तीन दिवसात एकही कोविड - 19 चा एकही रुग्ण आढळलेला नाही.ही नक्कीच l
दिलासादायक बाब आहे.राज्यात कोविड - 19 होणारी बाढ़ विशेषता पुणे ,मुंबई, औरंगाबाद, नागपुर येथील रुग्णाची वाढ ही चिन्ताजनक आहे.
बुधवारी आलेल्या रिपोर्ट पैकी १८ मधील ११ ,जनाचे रिपोर्ट निगेटिव आले आहे. तसेच पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालय वानवड़ी येथील उर्वरित ७ जनांचे रिपोर्ट ही नेगटिव आलेले आहेत.सर्वचे सर्व १८ रिपोर्ट हे नेगेटिव आलेले आहेत.
दरम्यान आलमगीर येथील दोन्ही रुग्णाचे रिपोर्ट ही नेगेटिव आल्याने दोघाना घरी सोडण्यात येणार आहे.अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रनेणे दिली आहे

*आत्मशुद्धीस आवश्यक - रोजा*




                            रमजानुल मुबारक - ६

                 *आत्मशुद्धीस आवश्यक - रोजा*
रमजान महिन्यातील प्रार्थनेचा मुख्य भाग म्हणजे रोजा किंवा उपवास . सूर्योदयापूर्वी पहाटेपासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत संपूर्ण दिवसात काहीही न खाता-पिता आत्म संयमाने रोजा पूर्ण केला जातो.
रोजा पाळणे म्हणजे केवळ भुकेले किंवा उपाशी राहणे नव्हे .आपले मन, मस्तिष्क, शरीर आणि संपूर्ण देहावर रोजामुळे नियंत्रण ठेवले जाते . बरेच लोक रोजा याचा अर्थ उपाशी राहणे एवढाच घेतात . परंतु अल्लाहतआला  ला रोजा मध्ये फक्त उपवास करणे अभिप्रेत नाही, तर आपल्या शरीराच्या संपूर्ण हालचालींवर स्वयंपद्धतीने नियंत्रण ठेवणे अभिप्रेत आहे. ज्यावेळी एखादी व्यक्ती रोजा धरण्याचा निश्चय करते आणि त्यासाठी सहेरी करते. त्यानंतर सायंकाळी सूर्यास्त होईपर्यंत मगरीबची अजाण होण्यापूर्वी दिवसभरात कितीही तहान लागली, भूक लागली तरी सुद्धा, खूप इच्छा असूनही पाणी पिण्याची किंवा काही खाण्याचे धारिष्ट्य ती व्यक्ती दाखवीत नाही. एकट्याने अंधारात किंवा एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन सुद्धा तो खाऊ पिऊ शकतो. परंतु त्याचा आत्मा आणि मनात असलेली अल्लाहची श्रद्धा किंवा अल्लाहाची भीती त्याला हे कृत्य करू देत नाही. त्याच्या मनामध्ये एक विचार रुजलेला असतो कि मी आज रोजा धरला आहे आणि मला तो आता सूर्यास्तापर्यंत पुर्ण करायचा आहे. तो केल्यानंतर मला अल्लाहकडून विशेष इनाम आखिरतमध्ये प्राप्त होणार आहे. याविचारामागे स्वयंशिस्त आहे. जी त्याने अंगी बाणलेली आहे . ही शिस्तच त्याला परमात्मा आणि आत्मा यांच्यातील दुवा साधण्यास मदत करते.

एखादा गुन्हेगार जेव्हा गुन्हा करतो तेव्हा त्याला या गुन्ह्याबद्दल होणाऱ्या शिक्षेची जाणीव किंवा माहिती असते. तरीपण तो असे गुन्हे करतो. काही सराईत प्रकारचे गुन्हेगार वारंवार ते गुन्हे करतात. त्यांच्या मनातून शिक्षेची भीती नाहीशी झालेली असते. कारण त्यांना माहित आहे येथील सर्व व्यवस्था ही मॅनेज होऊ शकते.परंतु ईश्वराची निर्माण केलेली व्यवस्था ही हाताळता येत नाही. तो नाराज झाला म्हणून लगेच शिक्षा देत नाही. तो आपल्या भक्तांवर आईच्या मायेपेक्षा जास्त प्रेम करतो. भक्तांनी चुका किंवा गुन्हे करू नये असे त्याला वाटते. केलेल्या चुकांबद्दल माफी मागण्याची संधी सुद्धा तो उपलब्ध करून देत असतो. रोजा सुद्धा अशीच एक संधी आहे. या संधीचा उपयोग करून आपण आपली आत्मशुद्धी करीत असतो .प्रार्थना किंवा इबादत केल्याने मनावरचे दडपण कमी होते . त्यासाठीच ईश्वराची आराधना अर्थात इबादत केली जाते . रोजा सुद्धा त्याची आराधना  करण्याचे एक साधन आहे . ते केल्याने मनाला, आत्म्याला एक प्रकारची शांती ( सुकून) प्राप्त होत असते . मानवी स्वभाव दोषाला नियंत्रित करण्याचे काम सुद्धा रोजा करीत असतो .दिवसभर वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या पंचायती करून बिनकामाचे लोक समाजामध्ये एक प्रकारचे अराजक निर्माण करतात . रोजा अशा अराजक निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना पायबंद घालण्याचे काम करतो .इतरांना कामाला लावून मजा पाहणाऱ्या वृत्तीला लगाम लावतो .प्रत्येकाने आपल्या मर्यादेत राहून जीवन व्यतीत करावे याचे प्रशिक्षण रोजातून मिळते .रोजा म्हणजे मानवी कल्याणासाठी आवश्यक मूल्ये आपल्यामध्ये रुजविण्याचे बहुमोल असे माध्यम आहे .(क्रमशः)
*सलीमखान पठाण*
*9226408082*



Wednesday, April 29, 2020

"ह्या पत्राच्या घरातून दुसऱ्या घरात डोकावले कि सर्वाची एकच अवस्था!उदया काय करावे या लोकांसाठी ?"






"ह्या पत्राच्या घरातून दुसऱ्या घरात डोकावले कि सर्वाची एकच अवस्था!उदया काय करावे या लोकांसाठी ?"

        एखादी व्यक्ती जीवाची बाजी लावून नदी पार करित असते. पण त्या व्यक्तीला नदीच्या पाण्याचा पूर्णपणे अंदाज येत नाही. जसे जसे तो नदीच्या मध्यभागी जातो, तसे पाणी वाढत जाते, व ते पाणी त्याला खाली ओढन्याचा प्रयत्न करते... पण तरी ही तो किनाऱ्यावर जाण्यासाठी पाण्यात हातपाय मारतच असतो धडपड करतच असतो.... त्याच प्रमाणे आमच्या बालभवन स्थित झोपड़पट्टीतील लोकांची ही दुरावस्था झालेली आहे. या 'करोना माहमारीने' अशी
अवस्था केली कि बस, रामवाड़ी झोपड़पट्टी मध्ये अंदाजीत बारा ते चौदा हजार सर्व जाती धर्माचे लोक दीड ते दोन एकर जागेवर राहतात. त्यामधील 300 कुटुंबा सोबत आपले बालभवन काम करते. जस जसे आपण स्नेहालय सह्योग किट वाटत आहोत. ते पुरेसे लोकांपर्यंत पुरत नसतात. कारण ते अतिगरजू लोकांची यादी करून, मोजके किट मोजक्या लोकांनाच देण्यात येते.... पण सर्व वस्तीवरच अवकळा पसरली आहे. तसेच परिसरातील सर्वच लोकांची परिस्थिती आता एक महिन्यानंतर बघवत नाही .जर ह्या पत्राच्या घरातून दुसऱ्या घरात डोकावले कि सर्वाची एकच अवस्था... मुले भुकेसाठी रडतात, आई व्याकूळतेने समजवते, कि जरा वेळेने देते तुला खाण्यास... तर घरातील पुरुष मंडळी खाली गुडघ्यात मुंडके घालून हताशपणे बसलेले. काय म्हणतील बायकोला व काय म्हणतील मुलांना कोठून आणतील चारा त्या चिमण्या पाखराला. तर दुसरे चित्र म्हतारे आई-वडील, केविल वाणी सुनाकडे व मुलाकडे बघताना दिसतात. त्याच्याच लेकरांना त्यांना जेवु घालायला घरात काही नाही, तर या म्हातारांचे काय? ते भुकेने शरीराचे वेटोळे करून गप्प, झोपेचे सोंग घेऊन मेल्याप्रमाणे पडलेले, व सुनांचा, मुलांचा व नातवंडाचा झालेल्या कोंडमारा व ते आपल्या डोळ्यात बघतात त्यांचे ते मुटकुळे केलेले शरीर त्यांचे पानवलेले डोळे काही तरी सांगतात पण शब्द फुटत नाही.... गप्प बसून येणाऱ्या जाणाऱ्याची हालचाल बघतात....कोणी अन्नदाता येईल का आज??... यांच्या मदतीला परिसरात आपण गेलो कि, ते आपल्या हाताकडे बघतात, व निराश नजरेने म्हणतात, बायानों तुम्ही तरी कुणा कुणाला पुरताल...कोणा कोणाचे पोट भराल... कोणा कोणाला देशाल... जेवढे भेटते तेच खरे आमचे समाधान... नाही भेटले तर आमचच फुटक नशीब... त्यांना आमची पण दयनिय अवस्था समजते,  हे लोक पण कुठुन व किती मदत गोळा करुण आनतील आणि किती पोट भरतील .... एवढा कसा समजुतदार पणा आला यांच्यात... "यांच्या पोटातील भुकेने कि या आजाराने दिला"..... नेहमी प्रत्येक जीवनावश्यक वस्तुंसाठी भांडत राहणारी वस्ती, कशी शांत झाली... जसे त्याच वस्तीवर अचानकपणे दुखाचे मोठे सावट पसरले...आम्ही सर्व कार्यकर्ते फक्त दिलासा देत," धिर धरा ताई, जातील हे दिवस, विश्वाची परिक्षा विश्वभर घेत आहे आपली". पुन्हा आपण सर्व यातून लवकरच बाहेर पडु. डोळ्यात पाणी आणु नका, फक्त बाहेर पडु नका. त्यांची परिस्थिती पाहून मन कसे गहिवरून येते. तुम्ही जर सेवावस्तीतुन जर एक चक्कर मारली, तर तुमची रात्रीची झोप उडेल.... तुम्ही फक्त त्याच विचारात रहाल, काय करु मी यांच्यासाठी?? कसे करु?? व हे भीषण वास्तव चित्र आम्हाला तर दररोज उघड़या डोळ्यांनी बघताना खुप वाईट वाटते... आम्ही सेवावस्तीतुन निघतो तेव्हा अंतकरण खुप जड झालेले असते. त्या जड मनाने रात्रभर अंथरूणवर पडून पंख्याकडे टक लावून बघायचे...व विचार करायचे, उदया काय करावे या लोकांसाठी.... रोज सकाळी उठून मोबाईलकडे लक्ष द्यायचे.... या आशेने, कुणाचा फोन येतो का??  तुमच्या लोकांसाठी काही मदत देतो म्हणून.... कोठून तरी सह्योग किट येतात का? परत या उमेदीने कामावर जातो.... व जे दान  करणारे दाते आहेत त्यांच्या घरांकडे रोज डोळे लावून आम्ही बसतो.... या आशेने..
        "दार उघड बाई... आता दार उघड"...

रजिया दफेदार
समन्वयक
शितिज बालभवन, रामवाड़ी

        

भारत देश सर्व जाती धर्मांचा आहे - अँड. सतिश पालवे


                          एडवोकेट सतीश पालवे
 
             #प्रगतीपथावरील_युवा #लेख_क्रमांक_०७

 भारत देश सर्व जाती धर्मांचा आहे - अँड. सतिश पालवे

        #चळवळीतला_कार्यकर्ता_ते_पक्षाचा_संस्थापक...

"हा भारत देश जितका हिंदूंचा आहे तितकाच मुस्लिमांचा सुध्दा आहे, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंगांनी, अश्फाक उल्लाह खान यांनी बलिदान दिलंय. " हे उद्गार आहेत अँड. सतिश (दादा)  पालवेंचे.  २०१८साली आपण बन्नोमाँ दर्ग्यात आयोजित केलेल्या महापुरुषांच्या संयुक्तिक जयंतीच्या कार्यक्रमात अँड. सतिश पालवे प्रमुख पाहुणे म्हणुन कार्यक्रमाला लाभले होते.दादांची वक्तृत्व शैली, संघटन कौशल्य अफाट आहे.
देवराई ता. पाथर्डी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या अँड. सतिश पालवे यांचा सामाजिक, राजकिय प्रवास या लेखाच्या माध्यमातुन आपण जाणुन घेणार आहोत.सतिशदादा सध्या अहमदनगर न्यायालयात वकिली करतात. अडल्या-नडलेल्यांना आधार देण्याचं काम करतात त्याचबरोबर शेतक-यांच्या हक्कासाठी, बहुजनांच्या विकासासाठी हे ब्रिदवाक्य सार्थ ठरवत क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातुन समाजसेवेचे व्रत अखंडपणे चालु आहे.
#शेतकरीपुत्राचा_राजकारणात_प्रवेश_कसा?
      अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील सतिश पालवे,राजकारणाचा आणि त्यांच्या कुटुंबाचा दुरदुरपर्यंत संबंध नाही.शेतक-यांविषयी असणारी आस्था-तळमळ त्यांना स्वस्थ बसु देत नव्हती. शेतक-यांच्या प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवण्याचे काम त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातुन केले.  १९९९ साली दादा महाविद्यालयीन जीवन जगत असताना माजी आमदार कै. राजाभाऊ राजळे यांनी राजकारणात सक्रीय प्रवेश केला. युवक काँग्रेसच्या माध्यमातुन त्यांनी तालुक्यात युवकांचे जाळे विस्तारण्यास सुरुवात केली. राजाभाऊंच्या पहिल्या दिवसापासुन ते २००७ पर्यंत सतिशदादा राजाभाऊंसोबत होते. राजाभाऊंनी पाथर्डी तालुक्यात दुध संघाचा चेअरमन दादांना केले. त्यावेळेस महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा चेअरमन होण्याचा बहुमान त्यांना मिळाला.

#स्वाभिमानी_शेतकरी_संघटनेचे_जिल्हाध्यक्ष
        २००८ साली शेतकरी नेते मा. खासदार राजु शेट्टी साहेबांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महाराष्ट्रभर झंझावात सुरु होता. संघटनेच्या माध्यमातुन उसाला भाव मिळावा, दुधाला भाव मिळावा अशा एक ना अनेक शेतक-यांच्या प्रश्नावर महाराष्ट्रभर आंदोलने सुरु होती. आंदोलनांना यश मिळत होते, शेतक-यांच्या चेह-यावर हसु होते. संसदेत त्यांचं कुणीतरी प्रतिनिधित्व करतंय याचे समाधान होते. राजु शेट्टींचे आणि दादांची तळमळ फक्त शेतकरी हिताकरीता आहे. समविचारी शेट्टींच्या कार्याने प्रेरीत होऊन २००८ साली दादांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.
          स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष पद भुषण असताना, शेतकरी हितासाठी वेळोवेळी आंदोलने उभारली. शेतक-यांना न्याय देण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. याच काळात आठ -दहा गुन्हे अंगावर घेतले. मानसिक त्रासाला त्यांना सामोरे जावे लागले. त्यावेळचे स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत यांच्यासोबत मतभेद झाल्याने दादांनी शेतकरी संघटना २०१५ साली सोडली.

#अण्णा_हजारेंसोबत_रामलिला_मैदानावर_आंदोलनात_सहभाग
     २०११ साली देश ढवळुन काढलेल्या अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनात रामलिला मैदान दिल्ली येथे दादांचा सक्रीय सहभाग होता. त्या मोठ्या मंचावरुन भाषण करणारे दादा महाराष्ट्रातले एकमेव कार्यकर्ते होते. या आंदोलनामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कुमार विश्वास, प्रशांत भूषण यांच्यासोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. आगामी काळात याचा फायदाही त्यांना झाला.

#क्रांतीकारी_शेतकरी_पक्षाची_स्थापना
        शेतक-यांच्या हक्कासाठी, बहुजनांच्या विकासासाठी हे ध्येय मनाशी बाळगुन दादांनी स्वाभिमानीतुन बाहेर पडल्यानंतर २०१६ साली क्रांतीकारी शेतकरी पक्षाची स्थापना केली.  मी जेव्हा दादांना क्रांतीकारी हे नाव ठेवण्यामागचा उद्देश विचारला तेव्हा त्यांनी मला सांगितले कि, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीकारकांचे अद्वितीय आणि अविस्मरणीय योगदान आहे. परंतु दुर्दैवाने देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देशवासियांना क्रांतीकारकांचा विसर पडलाय. क्रांतीकारकांच्या नावानेे कुठल्याही शासकिय योजना निघत नाहीत, त्यांची नावे महत्वाच्या वास्तुंना रस्त्यांना दिली जात नाहीत. "हर बरस लगेंगे शहिदों कि चिताओ पर मेले, वतन पर मिटनेवालों का यही बाकी निशान होगा" शहिदांना आस होती त्यांच्या बलिदानाची जाणीव देशवासीय ठेवतील. आज देशासाठी  हौतात्म्य पत्करलेल्या त्या जवानांच्या समाधीपुढे माझ्या पक्षाला त्यांचे नाव देऊन एक दिवा समाधीपुढे लावु शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे असे ते म्हणतात.

#शंकरराव_गडाख_पाटलांचा_क्रांतीकारी_पँटर्न
         २०१७ सालच्या जिल्हा परिषद -पंचायत समिती निवडणुका. आमदार शंकरराव गडाख पाटील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन बाहेर पडलेले होते. या निवडणुका अपक्ष लढायचं म्हटल्या तर सर्व उमेदवारांना एकच चिन्ह मिळणे दुरापास्त होते. गडाख साहेबांनी दादांना फोन करुन क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे एबी फाँर्म मागवले. नेवासा तालुक्यातील सर्व उमेदवार क्रांतीकारीकडुन निवडणुकीच्या रिंगणात होते. सतिशदादा तिसगाव गटातुन तर साईनाथ घोरपडे करंजी गणातुन निवडणुकीला उभे होते. निवडणुका पार पडल्या निकाल लागला. नेवासा तालुक्यातल्या सात पैकी पाच गटात तर पंचायत समितीच्या चौदा पैकी बारा जागांवर क्रांतीकारीचा झेंडा फडकला. नेवासा पंचायत समितीवर आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आहे .
      सतिशदादा म्हणतात माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवुन शंकररावांनी जी संधी मला माझ्या पक्षाला दिली. जिल्ह्यात नव्हे तर राज्यात ओळख मिळवुन दिली याबद्दल मी गडाख साहेबांचे आभार मानु इच्छितो.
        पुढे २०१९ विधानसभेच्या निवडणुका मोठमोठाल्या पक्षांकडुन संधी असताना केवळ पक्षाच्या नियमाप्रमाणे चलावं लागतं, वरिष्ठ ठरवतील तीच पुर्व दिशा मानावी लागते. मग तो निर्णय चुकीचा आहे का हे सुध्दा विचारण्याची मुभा नाही ,अशे अनेक  मागील कटु-गोड अनुभव पाठीशी असणार्या शंकरराव गडाख पाटील यांनी ही विधानसभा निवडणुक आपले पाथर्डीचे भुमिपुत्र अँड. सतिश पालवे  यांनी स्थापन केलेल्या क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातुन लढवण्याचं ठरवलं. हे एकप्रकारे धाडस म्हणावे लागेल कारण स्वतःच्या हिमतीवर मतदान गोळा करायचंय, मोठ्या पक्षाकडुन लढले असते तर स्टार प्रचारकांच्या सभा झाल्या असत्या, इथं स्टार कोण ? तर आपले प्रशांत भाऊ गडाख, उदयन गडाख, सुनिताताई गडाख, आदरणीय गडाख साहेब, परंतु मानलं पाहिजे या सर्वांना आतापर्यंत समाजासाठी दिलेलं योगदान, सहकारी संस्था, कारखाने, वेगवेगळ्या माध्यमातुन लोकांना दिलेला रोजगार, शिक्षण यामुळे अल्पावधीतच क्रांतीकारी शेतकरी पक्ष आणि त्याचं चिन्ह #बँट  घराघरात, मनामनात पोचले.... शंकररावांचा विक्रमी मतांनी विजय झाला. पुढे शिवसेनेला पाठींबा देऊन गडाख साहेब राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री झाले.

#मागे_वळुन_पाहताना....
       सतिशदादा म्हणतात क्रांतीकारकांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोचवण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासुन मी शाळा, महाविद्यालयामध्ये व्याख्याने देतो. माझ्या आयुष्यात मी अनेक कामे केली परंतु दुर्दैव असं कि मतदानाच्या वेळी पक्ष पाहिला जातो, घराणेशाही चालते, आगामी काळात तळागाळातल्या युवकांना संधी देऊन त्यांना प्रवाहात आणण्याचा विचार असल्याचे ते सांगतात.
     #दादा तुमच्या या कार्याला माझा क्रांतीकारी सलाम.....

एस मुन्ना,
बोधेगाव, शेवगाव.

"मुझे खुशी है के मेरा प्लाज्मा किसीके काम आ सका !"पहिला प्लाज्मा डोनर तबरेजखान

    सुल्तानपुरी क्वारणटाईनसेंटर के बाहर प्लाज्मा डोनेशन के             लिए लाईन में खड़े हुए तबलीग जमात के साथी

"मुझे खुशी है के मेरा प्लाज्मा किसीके काम आ       सका !"पहिला प्लाज्मा डोनर तबरेजखान


"करोना के रिसर्च या किसी ट्रायल मेंरा शरीर काम आ सके तो मैं देश के लिए तैयार हूँ." यह अल्फाज है, कोरोना महामारी के इलाज के रिसर्च के लिए भारत के पहिले प्लाज्मा डोनर ३६ साल उम्र तबरेज खानके है.जिनका कारोबार मोजे(सॉक्स)का है,जो दिल्लीके जहाँगीरपूरी में रहते है.तबरेजखान के प्लाज्मा डोनेशन(दान) के कारण एलएनजेपी अस्पताल के दो अत्यावस्थ मरीज की हालात सामान्य हो गयी है.उन्हें जनरल वार्ड में लाया गया है.
प्लाज्मा डोनेट के बाद तबरेजखान ने कहा,मुझे पता नही, मेरा प्लाज्मा किसे चढाया गया,उसका मजहब क्या है ?आपने भाई के लिए प्लाज्मा डोनेशन किया है. मुझे खुशी है मेरा प्लाज्मा किसीके काम आ सका.कोरोना महामारी पूरे देशको दर्द दे रही है.हम सब का एक ही मकसद होना चाहिए,इस बीमारीक़े खिलाफ जंग जीतो.
तबरेजखान को उनकी  बहन दुबईसे मिलने आने पर कोरोना पॉजिटिव पायी गयी.जिससे १८ मार्च को एलएनजेपी अस्पताल में पॉजिटिव पाया गया,३एप्रिल २०२० को पहिली रिपोर्ट में नेगेटिव पाया गया,५एप्रिल दूसरी रिपोर्ट भी नेगेटिव निकली,अस्पताल से घर भेजकर १९एप्रिल तक क्वारणताएँ किया गया. जब पहिले ट्रायल डोनर की दिल्ली के मुख्यमंत्री की अपील पर एलएनजेपी अस्पताल फोन कर अपना नाम पहिला प्लाज्मा डोनर कर दर्ज करवाया और प्लाज्मा दान तीन सायकल में करवाया.जिसकी वजहसे दो कोरोना मरीज वेंटिलेटर पर जा सकते थे. तबरेजखान की प्लाज्मा की वजह से सामान्य बन चुकी है.प्लाज्मा इंसान का होता है,तो इंसान को चढता है.जानवर का प्लाज़्मा इंसान को नही चढता. तबरेजखान ने मिसाल कायम की है.
देशमे कोरोना के इलाज केलिए प्लाज्मा डोनर की तलाश की चुनौती है.तबलीग जमात के लगभग २०० साथीने अपना प्लाज्मा सुल्तानपुरी क्वारणताएँ सेंटर में देने के किए आये थे.ज्यादातर दिल्ली के बाहर के थे. लॉक डाउन की वजहसे घर नही जा सकते थे. अथॉरटीने उन्हें कई शिफ्ट कराया है. और प्लाज्मा डोनेशन के लिए बुलाया जाएगा.।
अब सवाल ये भी तो है,जमात के कुछ मरीज नेगेटिव होने पर दिल्ली बाहर के लॉकडाउन की वजहसे उन्हें भेज ना सकी. अपने तौर पर रहनेका इंतजाम कर रही है.अचानक लॉकडाउन की वजह से मरकज के जिम्मेदार कैसे भेज पाते?
बिना सोंचे कोरोना फैलाने का जिम्मेदार तबलीग जमातके मुसलमानो को ठहराया गया.
खुशी इस बात की तबरेजखान के प्लाज्मा डोनेशन की वजह से दो करोना के मरीज की सेहत सुधर रही है.और अब तबकिग जमात के जो मूसलमान है, सैकड़ों प्लाज़्मा कोरोना को हद्दपार केलिए दिल्लीमें आज मौलाना साद साहब की आवाज पर लाइन लगाए खड़े है.अब मीडिया और मुसलमानो से नफरत की सियासत करनेवाले क्या अंधे बन बैठे है.
"अब के वक्त है,देश के साथ सभी भारतीयों को एक साथ मजबूती से कोरोना को देश से निकाल बाहर करवाने का!"

अफज़ल सय्यद,
एडिटर, न्यूज व्हलुज

Tuesday, April 28, 2020

अहमदनगर शहरातील मध्यावर्ती भागातील मस्जिदीचा आजान साठी समावेश करण्यात याव्यात



अहमदनगर शहरातील मध्यावर्ती भागातील मस्जिदीचा आजान साठी समावेश करण्यात याव्यात.
          अहमदनगर युवा फाउंडेशनची मागणी
अहमदनगर शहरातील अज़ान साठी ठरवलेले मस्जिद मध्ये पारशाहखूंट, पिंजारगल्ली, काळू बागवान गल्ली मोहल्ला व जुना कापड बाजार परिसरातील मस्जिद वगळन्यात आला आहे, त्या निमित्त या भागातील मस्जिदचा समावेश करून अज़ानची परवानगी देण्यात यावी.अशी मागणी अहमदनगर युवा फाउंडेशन च्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली .
पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके साहेब सर्वात अगोदर आपले व प्रशासनाचे धन्यवाद की पवित्र रमजान महिन्याकरीता आपण अज़ान साठी परवानगी दिलेत, आपणास या दारे विनंती अर्ज करतो की साहेब आपण जे मस्जिद मध्ये अज़ान पुकारण्याकरीता मस्जिदची यादी तयार करून जाहिर केले आहे त्यात आपण पारशाहखुट, पिंजारगल्ली, काळू बागवान गल्ली मोहल्ला व जुना कापड बजार या पूर्ण भाग वगळन्यात आला आहे, या भागात मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे. आपण जी यादि तैयार केले आहे त्यात या भागाचे एक ही मस्जिदचा समावेश नाही आहे, तरी मा. संदीप मिटके साहेब आपण नम्रची विनंती आहे कि आपण याची धकल घ्यावी व या भागातील मस्जिदांन पैकी कोणत्याही एक मस्जिदचा त्यात समावेश करावा व या परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा.फाऊंडेशन चे अध्यक्ष अल्तमश जरीवाला यांनी निवेदना द्वारे मागणी केली आहे.
                      ************
अहमदनगर शहरातील २३मशिदीना मगरिब आजान साठी परवानगी
अहमदनगर शहरातील 23 मशिदींना मगरिब ची अजान देण्याची परवानगी मिळाली. उपवास सोडताना त्याचा वेळ करण्यासाठी फक्त मगरिब ची अजान देण्यात येणार आहे. ही अजान फक्त वेळ समजण्यासाठी देण्यात येणार आहे तरी अजाना ऐकून कोणीही मशिदीमध्ये येऊ नये व नमाजपठण करू नये आपल्याच घरी नमाज पठण करावे असे आवाहन जिल्हा पोलिस प्रशासनाने केले आहे


मशिदीचे नाव :-

१) बक्करकसा मशीद
२) पटवेकर मशिद
३) सुंनी कुरेशी मशिद
४) जलाली मशीद
५) सेतु कारंजे मशिद
६) बारामासी मशिद - हातमपुरा
७) मोहम्मदी मशिद
८) लालमिस्तरी मशिद
९) शमशेर बाजार मशिद -सर्जेपुरा
१०)vहुसेनी मशिद - कोटला
११) तांबोळी कब्रस्तान मशिद
१२) कविजंग नगर मशिद
१३) नुरानी मशिद - बोल्हेगाव
१४) नूरानी मशिद-  लाल टाकी १५) अपघाती चौक
१६) बडी मशिद-  मुकुंदनगर
१७) आयेशा मशिद - मुकुंदनगर
१८) छोटी मरियम मशिद- मुकुंदनगर
१९) बडी मरियम मशिद- मुकुंदनगर
२०) दर्गा दायरा मशिद - मुकुंदनगर
२१) मोमीन पुरा मशिद- मोमीन पुरा भिंगार
२२) अलमगीर मदरसा मशिद- अलमगीर
२३) करी मशिद