Wednesday, April 29, 2020

भारत देश सर्व जाती धर्मांचा आहे - अँड. सतिश पालवे


                          एडवोकेट सतीश पालवे
 
             #प्रगतीपथावरील_युवा #लेख_क्रमांक_०७

 भारत देश सर्व जाती धर्मांचा आहे - अँड. सतिश पालवे

        #चळवळीतला_कार्यकर्ता_ते_पक्षाचा_संस्थापक...

"हा भारत देश जितका हिंदूंचा आहे तितकाच मुस्लिमांचा सुध्दा आहे, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंगांनी, अश्फाक उल्लाह खान यांनी बलिदान दिलंय. " हे उद्गार आहेत अँड. सतिश (दादा)  पालवेंचे.  २०१८साली आपण बन्नोमाँ दर्ग्यात आयोजित केलेल्या महापुरुषांच्या संयुक्तिक जयंतीच्या कार्यक्रमात अँड. सतिश पालवे प्रमुख पाहुणे म्हणुन कार्यक्रमाला लाभले होते.दादांची वक्तृत्व शैली, संघटन कौशल्य अफाट आहे.
देवराई ता. पाथर्डी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या अँड. सतिश पालवे यांचा सामाजिक, राजकिय प्रवास या लेखाच्या माध्यमातुन आपण जाणुन घेणार आहोत.सतिशदादा सध्या अहमदनगर न्यायालयात वकिली करतात. अडल्या-नडलेल्यांना आधार देण्याचं काम करतात त्याचबरोबर शेतक-यांच्या हक्कासाठी, बहुजनांच्या विकासासाठी हे ब्रिदवाक्य सार्थ ठरवत क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातुन समाजसेवेचे व्रत अखंडपणे चालु आहे.
#शेतकरीपुत्राचा_राजकारणात_प्रवेश_कसा?
      अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील सतिश पालवे,राजकारणाचा आणि त्यांच्या कुटुंबाचा दुरदुरपर्यंत संबंध नाही.शेतक-यांविषयी असणारी आस्था-तळमळ त्यांना स्वस्थ बसु देत नव्हती. शेतक-यांच्या प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवण्याचे काम त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातुन केले.  १९९९ साली दादा महाविद्यालयीन जीवन जगत असताना माजी आमदार कै. राजाभाऊ राजळे यांनी राजकारणात सक्रीय प्रवेश केला. युवक काँग्रेसच्या माध्यमातुन त्यांनी तालुक्यात युवकांचे जाळे विस्तारण्यास सुरुवात केली. राजाभाऊंच्या पहिल्या दिवसापासुन ते २००७ पर्यंत सतिशदादा राजाभाऊंसोबत होते. राजाभाऊंनी पाथर्डी तालुक्यात दुध संघाचा चेअरमन दादांना केले. त्यावेळेस महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा चेअरमन होण्याचा बहुमान त्यांना मिळाला.

#स्वाभिमानी_शेतकरी_संघटनेचे_जिल्हाध्यक्ष
        २००८ साली शेतकरी नेते मा. खासदार राजु शेट्टी साहेबांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महाराष्ट्रभर झंझावात सुरु होता. संघटनेच्या माध्यमातुन उसाला भाव मिळावा, दुधाला भाव मिळावा अशा एक ना अनेक शेतक-यांच्या प्रश्नावर महाराष्ट्रभर आंदोलने सुरु होती. आंदोलनांना यश मिळत होते, शेतक-यांच्या चेह-यावर हसु होते. संसदेत त्यांचं कुणीतरी प्रतिनिधित्व करतंय याचे समाधान होते. राजु शेट्टींचे आणि दादांची तळमळ फक्त शेतकरी हिताकरीता आहे. समविचारी शेट्टींच्या कार्याने प्रेरीत होऊन २००८ साली दादांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.
          स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष पद भुषण असताना, शेतकरी हितासाठी वेळोवेळी आंदोलने उभारली. शेतक-यांना न्याय देण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. याच काळात आठ -दहा गुन्हे अंगावर घेतले. मानसिक त्रासाला त्यांना सामोरे जावे लागले. त्यावेळचे स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत यांच्यासोबत मतभेद झाल्याने दादांनी शेतकरी संघटना २०१५ साली सोडली.

#अण्णा_हजारेंसोबत_रामलिला_मैदानावर_आंदोलनात_सहभाग
     २०११ साली देश ढवळुन काढलेल्या अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनात रामलिला मैदान दिल्ली येथे दादांचा सक्रीय सहभाग होता. त्या मोठ्या मंचावरुन भाषण करणारे दादा महाराष्ट्रातले एकमेव कार्यकर्ते होते. या आंदोलनामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कुमार विश्वास, प्रशांत भूषण यांच्यासोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. आगामी काळात याचा फायदाही त्यांना झाला.

#क्रांतीकारी_शेतकरी_पक्षाची_स्थापना
        शेतक-यांच्या हक्कासाठी, बहुजनांच्या विकासासाठी हे ध्येय मनाशी बाळगुन दादांनी स्वाभिमानीतुन बाहेर पडल्यानंतर २०१६ साली क्रांतीकारी शेतकरी पक्षाची स्थापना केली.  मी जेव्हा दादांना क्रांतीकारी हे नाव ठेवण्यामागचा उद्देश विचारला तेव्हा त्यांनी मला सांगितले कि, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीकारकांचे अद्वितीय आणि अविस्मरणीय योगदान आहे. परंतु दुर्दैवाने देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देशवासियांना क्रांतीकारकांचा विसर पडलाय. क्रांतीकारकांच्या नावानेे कुठल्याही शासकिय योजना निघत नाहीत, त्यांची नावे महत्वाच्या वास्तुंना रस्त्यांना दिली जात नाहीत. "हर बरस लगेंगे शहिदों कि चिताओ पर मेले, वतन पर मिटनेवालों का यही बाकी निशान होगा" शहिदांना आस होती त्यांच्या बलिदानाची जाणीव देशवासीय ठेवतील. आज देशासाठी  हौतात्म्य पत्करलेल्या त्या जवानांच्या समाधीपुढे माझ्या पक्षाला त्यांचे नाव देऊन एक दिवा समाधीपुढे लावु शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे असे ते म्हणतात.

#शंकरराव_गडाख_पाटलांचा_क्रांतीकारी_पँटर्न
         २०१७ सालच्या जिल्हा परिषद -पंचायत समिती निवडणुका. आमदार शंकरराव गडाख पाटील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन बाहेर पडलेले होते. या निवडणुका अपक्ष लढायचं म्हटल्या तर सर्व उमेदवारांना एकच चिन्ह मिळणे दुरापास्त होते. गडाख साहेबांनी दादांना फोन करुन क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे एबी फाँर्म मागवले. नेवासा तालुक्यातील सर्व उमेदवार क्रांतीकारीकडुन निवडणुकीच्या रिंगणात होते. सतिशदादा तिसगाव गटातुन तर साईनाथ घोरपडे करंजी गणातुन निवडणुकीला उभे होते. निवडणुका पार पडल्या निकाल लागला. नेवासा तालुक्यातल्या सात पैकी पाच गटात तर पंचायत समितीच्या चौदा पैकी बारा जागांवर क्रांतीकारीचा झेंडा फडकला. नेवासा पंचायत समितीवर आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आहे .
      सतिशदादा म्हणतात माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवुन शंकररावांनी जी संधी मला माझ्या पक्षाला दिली. जिल्ह्यात नव्हे तर राज्यात ओळख मिळवुन दिली याबद्दल मी गडाख साहेबांचे आभार मानु इच्छितो.
        पुढे २०१९ विधानसभेच्या निवडणुका मोठमोठाल्या पक्षांकडुन संधी असताना केवळ पक्षाच्या नियमाप्रमाणे चलावं लागतं, वरिष्ठ ठरवतील तीच पुर्व दिशा मानावी लागते. मग तो निर्णय चुकीचा आहे का हे सुध्दा विचारण्याची मुभा नाही ,अशे अनेक  मागील कटु-गोड अनुभव पाठीशी असणार्या शंकरराव गडाख पाटील यांनी ही विधानसभा निवडणुक आपले पाथर्डीचे भुमिपुत्र अँड. सतिश पालवे  यांनी स्थापन केलेल्या क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातुन लढवण्याचं ठरवलं. हे एकप्रकारे धाडस म्हणावे लागेल कारण स्वतःच्या हिमतीवर मतदान गोळा करायचंय, मोठ्या पक्षाकडुन लढले असते तर स्टार प्रचारकांच्या सभा झाल्या असत्या, इथं स्टार कोण ? तर आपले प्रशांत भाऊ गडाख, उदयन गडाख, सुनिताताई गडाख, आदरणीय गडाख साहेब, परंतु मानलं पाहिजे या सर्वांना आतापर्यंत समाजासाठी दिलेलं योगदान, सहकारी संस्था, कारखाने, वेगवेगळ्या माध्यमातुन लोकांना दिलेला रोजगार, शिक्षण यामुळे अल्पावधीतच क्रांतीकारी शेतकरी पक्ष आणि त्याचं चिन्ह #बँट  घराघरात, मनामनात पोचले.... शंकररावांचा विक्रमी मतांनी विजय झाला. पुढे शिवसेनेला पाठींबा देऊन गडाख साहेब राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री झाले.

#मागे_वळुन_पाहताना....
       सतिशदादा म्हणतात क्रांतीकारकांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोचवण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासुन मी शाळा, महाविद्यालयामध्ये व्याख्याने देतो. माझ्या आयुष्यात मी अनेक कामे केली परंतु दुर्दैव असं कि मतदानाच्या वेळी पक्ष पाहिला जातो, घराणेशाही चालते, आगामी काळात तळागाळातल्या युवकांना संधी देऊन त्यांना प्रवाहात आणण्याचा विचार असल्याचे ते सांगतात.
     #दादा तुमच्या या कार्याला माझा क्रांतीकारी सलाम.....

एस मुन्ना,
बोधेगाव, शेवगाव.

No comments:

Post a Comment