Friday, April 24, 2020

नितिन गडकरी साहेबाना जाहिर पत्र,


  • नितिन गडकरी साहेबाना जाहिर पत्र,विरोधकाला विरोध ठीक आहे पण सर्वासामान्या बाबत ही का बर असे ?

मा.ना.गडकरी साहेब, (केंद्रीय मंत्री)

आपण म्हणाला, "परप्रांतियासाठी रेल्वेच्या मागनिला मी विरोध करत नाही,गावात रोजगार कुठे ? रोजगार नाही
म्हणूनच पुण्या मुंबईत आले"
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी परप्रांतियांना विशेष रेल्वे सोडण्याची केंद्र सरकार मागणी केली.या बाबत आपनाला न्यूज चॅनेल के एंकर ने विचारले असता आपण टिपिकल राजकीय अंदाजात मिश्किलपणे स्मित हास्य करीत सहानुभूति मिश्रित विरोध दर्शविला.
देशभरात कोविड 19 सारख्या महामारी मुळे लॉकडाउन सरकारने अचानक जाहिर केल्याने प्रत्येक भूमिपुत्र असो,महाराष्ट्राचा असो वा परप्रांतीय म्हणजेच भारतीय कष्टकरी हाथ बेरोजगार झाला.दोन चार दिवस देशासाठी सर्वजन गप्प राहिले. तद नंतर जत्थे नी जत्थे निघाले पुण्या मुंबई हुन आपल्या गावाकडे कोणी पायी निघाले कोणी टेंकर तर कोणी कन्टेनर मधून लक्ष्य एकच कुटुंब. आपण ज्या न्यूज चॅनेलला मुलाखत दिली,त्या सहित सर्वानी दाखविलेल्या भय आणि द्वेषपूर्ण बातम्या सतत दाखवून हळू हळू रोजगारा साथी गाव, जिल्हा, राज्य सोडून आलेल्या भारतीय कष्टकरी, मजदूरांची गावाकडील बायको पोरांसाठीची म्हणजेच प्रपंचाची चिंता वाढवली.
"घार घिराटया घ्याली उंच उंच आकाशी चित्त सारे पिलापाशी"
संकट समयी प्रत्येकाला आपल्या कुटुंबचा आधार घरचा कर्ता पुरूष बरोबर असल्यास घराच्याना मोठा धीर आधार असतो.तसाच घरच्याही कर्ता पुरुषास आपण आपल्या कुटुंबा पासून दूर राहिल्यास फिकरीने जेवनसुध्दा गोड लागत नाही.गडकरी साहेब आपण म्हणालात, गावात रोजगार कुठे आहे ? येथे लॉक डाउनच्या काळात कोणते रोजगार सुरु आहे.केंद्र सरकार घर बसल्याने काही रोजनदारी देणार आहे का ? राजकीय भाषेत माझा प्रश्न आपणास विचारतो,यूपी बिहार आणि ज्या राज्यात भाजपा सरकार आहे.तेथील सरकारने विशेष अनुदान कोविड 19 महामारीने रोजगार बंद असल्याने दिले तेथील घरात वाटले आहे काय ?
बऱ्याच ठिकाणी केंद्र शासनाने जाहिर केलेले प्रत्येक व्यक्ति पाच किलो तांदूळ पोहचलेले नाही. तीन किलो गहू जाहिर करून रद्द करण्यात आले. आपणच न्यूज चॅनेल एकदा काबुली दिली होती राजकारणात आस्वासने द्यायचे असतात.
साहेब प्रपंचाला आस्वासन देवून चालत नाही. मोठ्या जबाबदारीने दुसऱ्याच्या लेकिला चार चौघात लग्न करून आपण आनलेले असते.मोठ्या विस्वासाने ती तुमच्या पोरांची आई बनते. ती तुमच्या पासून मोठी अपेक्षा ठेवत नाही.तिला हवी असते सुखादुखात नवऱ्याची साथ.आज तिला रोजनदारी गरज नाही तर तिला गरज आहे तिच्या नवऱ्याची.जो तिचा आणि तिच्या मुलांचा आधार असेल.तिलाही आपल्या पासून दूर असलेल्या नवऱ्याची काळजी वाटते.
साहेब राजकरणी आणि उद्योगपति सर्वाना एकाच पट्टीत मोजतात. फरक आणि भावनांना काहीच समजत नाही.कळते फक्त आदेश आणि दबाव आणि हम करे सो कायदा !
साहेब एक उदाहरण बघा, आपल्या सरकारने नोटबन्दी लागू केली,आमच्या सारखी माणसे रांगेत उभी राहिली. माझ्या पोरीच्या एंगेजमेंट कार्यक्रम साठी माझेच खात्यातील फक्त दहा हजार रुपये मला बँक खात्यातून काढता आले नाही.
आपल्या मुलीचे लग्न पत्रिकाची लग्नपत्रिकेच्या किमतीची चर्चा होत होती देशामध्ये.
 मी बऱ्याच दिवस विचार करत होतो.देशभक्तीच्या नावे आपल्याला डोस पाजले जाते.बप्पा बर आहे राजकारण्याच देशाची आपत्ति ही गोर गरीबासाठीच असते.यांचे मात्र सर्व काही ठिकच चालते. आजच्या परिस्थिति यांचे आप्ताचे (पोरांचे, नाटवांचे) लग्न फिजिकल डिस्टनिंग तोडून लागते. आम्हाला मात्रा जिथे असेल तिथेच थांबा, अशी सक्ति असते.सत्ते शपथविधी लॉक डाउन साथी नजर अंदाजी केली जाते.शपथविधी पार पडता अचानक लॉकडाउन देशभर लागू केली जाते.
साहेब आपण म्हणाले,"मुंबई सह अन्य शहरात परप्रांतिय मजूर गावाकडे गेल्यास खाणार काय? असा प्रश्न उपस्थित करण्या ऐवजी विशेष रेल्वे सुरु करण्या बाबत प्रयत्न करण्याचे  शब्द अपेक्षित होते. विरोधकाला विरोध ठीक आहे पण सर्वासामान्या बाबत ही का बर असे ?
                                                  सर्वासामान्य जनता



No comments:

Post a Comment