Monday, April 20, 2020

परमिटधारक रिक्षाचालकांना शासनाने आर्थिक मदत मिळावी




                                           न्यूज व्हलुज -

परमिटधारक रिक्षाचालकांना शासनाने आर्थिक मदत मिळावी
अहमदनगर - कोरोना वायरस मुळे लागु करण्यात आलेल्या लॉक डाऊन मधे रिक्षावाले यांच्यावर उपासमारीची वेळ न येऊ देता रिक्षा सुरु करणे अथवा रिक्षा चालकांना मानधन - आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी.आम्ही सामाजिक संस्था, समाजहिता साठी अग्रेसर काम करणाऱ्या अहमदनगर सोशल क्लब फाऊंडेशन च्यावतीने निवेदना द्वारे मागणी करण्यात आली. सद्या अहमदनगर शहराबरोबरच राज्य व देशपातळीवर सर्वत्र जागतिक कोरोना वायरस मुळे लॉक डाऊन, हॉट स्पॉट लावण्यात आलेले आहे.
            अनेक गोरगरीब जनता, नागरिक यामधे कामगार, मजुर शेतकरी, टॅक्सी ड्रायव्हर, छोटे - छोटे व्यावसायिक, हतावर पोट भरणारे, रोजच्या रोज काम करुन एक वेळ चे जेवन मुश्कीलीने ज्यांना मिळते असे *अहमदनगर शहराची लाईफ लाईन* ज्याला म्हंटले जाते असे रिक्षावाले यां सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे.
       गरीब, श्रीमंत सर्वांनाच या जीवनावश्यक रिक्षा वाहतुकीची आवश्यकता भासत आहे. आपण लागू केलेल्या लॉक डाऊन मधुन सदर रिक्षा वाहतुकीला शिथीलता देवुन शासनाने परमिट, परवाना दिलेल्या अॅटो रिक्षा चालकांना वाहतुकीची परवानगी देऊन मान.जिल्हाधिकारी साहेब, अहमदनगर यांनी जिल्हा पातळीवर भरघोस आर्थिक मदत - मानधन उपलब्ध करून द्यावे जेणे करून या सामान्य गरीब रिक्षा चालकांवर उपासमारीची भयंकर वेळ येणार नाही. व या सामान्य गरीब रिक्षा चालकांचा दुवा मिळाल्याशिवाय राहणार नाही.अशी मागणी अहमदनगर सोशल क्लब फाऊंडेशन च्यावतीने अध्यक्ष नईम सरदार, सेक्रेटरी इंजि.इम्रान हाजी अन्वर खान पत्रकार, कासम भाई केबलवाला, पै.मोसीम इमाम शेख, दानिश शेख, डॉ.साहिल अहेमद, पै.हमजा चुडीवाला, राजमोहम्मद नुरी, जावेद खान, शादाब शेख, अर्यान नईम आदींनी एका निवेदनाद्वारे मान.जिल्हाधिकारी, अहमदनगर यांना केली आहे.


No comments:

Post a Comment