Wednesday, April 22, 2020

*"घर से मस्जिद बहोत दूर है मगर, चलो किसी जरूरतमंद को ही हसा दे"....*



*"घर से मस्जिद बहोत दूर है मगर, चलो किसी जरूरतमंद को ही हसा दे"....* 

               परिस्थिती कोणतीही असो, ऊन असो, पाऊस असो, महामारी असो किंवा कर्फ्यू असो पोटाची आग विझवावीच लागते. अशा परिस्थितीत मला कुठून जेवण भेटेल का? कोणी मला खायला तुकडा देईल का? आता तर बीपीच्या त्रासाने सारखीच भूक लागते, घरात जेवढे होते, ते पण संपले ,भूक सहन होत नाही, हात थरथर कापतात. उठता येत नाही व बसताही येत नाही, कोणतेच काम आता होत नाही. अश्या परिस्थितीत आजीबाई सदर बाजार भिंगार येथील छोट्याशा मातीच्या घरात राहते, त्यांच्या जवळच आमच्या  बालभवनच्या शिक्षिका गुलनाज मैडम राहतात, त्यांना आजीची वाईट परिस्थिती लक्षात आली. आजीला दोन मुले, सुन, व नातवंडे, सर्व अजमेरला नातवाच्या लग्नासाठी फेब्रुवारीच्या 25 तारखेला गेलेली. आम्ही लवकर येतो 15 एक दिवसात म्हणून.घरात 64 वर्षांची विधवा म्हातारी शिवबाईला एकटीच सोडून. तिला बरोबर घेऊन जावे तर त्यांच्याकडे तिकिटासाठी पुरेशे पैसे नाही.मुलाचा घरांना रंगकाम करण्याचा छोटासा व्यवसाय. मुलाला देखील वाटले नाही की आईला एकटीला कसे सोडून जावे. कोणाच्या भरवश्यावर जावे. पण अचानक 'कोरोना' या जैविक महामारीने आपले पाय या जगात असे पसरले की सर्व येण्या- जाण्याची साधने बंद झाली.दोन्ही मुले अजमेरला अटकली. म्हातारी एवढ्याशा चार भिंतीच्या घरात गेल्या दीड महिन्यापासून एकटीच. देणारे मायेचे हात काहीतरी उलट सुलट म्हातारीला देत. परंतु आजूबाजूच्या लोकांची परिस्थिती देखील तशीच बेताची. देणारे कधी पर्यंत देणार. नंतर आजी लोकांच्या दारोदार जेवण मागण्यांसाठी हिंडू लागली. बीपीच्या गोळ्या संपल्या, जवळ एक दमडीही नाही. परंतु ते म्हणतात ना, "जाको राखे साईया  मार सकेना कोई" आम्हाला या आजीची रोजची परिस्थिती पहावेना. आम्ही 'सहयोग किट' साठी आजीचं नाव सुचवलं. आजीच्या घरी जाऊन तिलाही सहयोग किट पोहच केलं. जेणेकरून ती चुलीवर दोन वेळेस काहीतरी करून स्वतःच्या पोटाची खळगी तरी भरेल. आमच्या सर्व स्टाफने आपसात वर्गणी गोळा करून आजीला महिनाभर पुरेल ऐवढ्या बीपीच्या गोळ्याही आजीला घेऊन दिल्या. ते किट व औषधे पाहून तिचे ऊर भरून आले, पोटाचा मुलगा जरी जवळ नसला तरीही तुम्ही माझे मुलं बनून देवासारखे धावत आलात, हे ऋण मी कसे फेडणार, देव तुम्हांला भरभरून देवो असा आशीर्वाद तिने आम्हाला दिले. आजीबाईच्या चेहर्‍यावरच आनंद व समाधान पाहून आम्हाला पण खूप बरे वाटले. आपण करत असलेल्या कामाबद्दल खूप गर्व वाटले...यावेळी एक शायरी आठवते, "घर से मस्जिद बहोत दूर है मगर, चलो किसी जरूरतमंद को ही हसा दे". कोरोना महामारीच्या लॉक डाउन मधे अनेक मदतीचे हाथ गराजू लोकांपर्यंत पोहचत आहे.त्यात आमचाही खारीचा वाटा आहे,एक मात्र निश्चित आम्हांला रोज किती तरी दुवा नकळत मिळतात हेच आमचे भाग्य....

निलोफर शेख
समन्वयक
ऊर्जा बालभवन भिंगार....

No comments:

Post a Comment