Wednesday, April 22, 2020

कारण संकटसमयी जातीचे नव्हे तर माणुसकीचे नाते कामाला येते...


#जात हा केवळ एक #अपघात आहे त्याबद्दल कधीच गर्व बाळगु नका, कारण संकटसमयी जातीचे नव्हे तर #माणुसकीचे_नाते कामाला येते...


    20 एप्रिल रोजी  बैलगाडी घेऊन साखर कारखान्यावरुन स्वतःच्या गावी निघालेल्या ऊसतोड मजूर पंढरीनाथ सर्जेराव साळवे मु. रसुलाबाद पोस्ट ,चकलांबा ता. गेवराई जि. बीड व ज्ञानेश्वर ढोणे रा. कासारवाडी ता. गेवराई जिल्हा बीड हे गावाकडे चालले होते. साळवे यांच्या गाडीला 20 एप्रिलला पहाटे भुते टाकळी जवळ ता. पाथर्डी जि. अहमदनगर येथे एका अज्ञात वाहनाने मागून धडक दिली ,त्यात त्याची बैलगाडी चकनाचूर झाली ,संसार रस्त्यावरती विखुरला गेला ,तो स्वतःही जबर जखमी झाला.याच्या ह्या झालेल्या नुसकानीसाठी कुणी आर्थिक मदत करणार आहे का?त्याला भेटून कुणी धीर देणार आहे का ?

   सहामहिने हाडाची काडकरून ऊसतोडल्यावर कसे बसे चार पैसे त्याच्या पदरात पडतात ,त्यात अस काही झालं की त्यांने काय करावे? हंगाम संपल्यावर साखर कारखान्याने कामगारांना घरपोहच करावं असा नियम असतांना हा मजूर बैलगाडीने पायी का निघला ,हा प्रश्न अनुत्तरीत आहे , त्यांच्या ताब्यात असत़ाना कामगारांची हेळसांड करणारे साखर कारखाने यांच्यासाठी आता काय करणार ?ते जबाबदार झटकून मोकळे होणार ,
        सर्वप्रथम सोशल मिडीयावर माझे मित्र लक्ष्मण खेडकर सरांनी या आपदाग्रस्त कुटुंबियांची व्यथा मांडली. त्यांची पोस्ट वा-यासारखी व्हायरल झाली. खासरे डाँट काँम सारख्या प्रसिद्ध पेजवरही ही पोस्ट गेली. शिरुर कासारचे माझे मित्र अविनाश सानप यांनीही या कुटुंबियांच्या मदतीसाठी मित्रपरिवाराला आवाहन केले. त्यांच्या माध्यमातुन थोडीफार मदत गोळा झाली. चकलांब्याचे माझे मित्र सामाजिक कार्यकर्ते अशोक गुंजाळ यांना ही बातमी समजताच त्यांनी धनंजय मुंडेंना फोन करुन या कुटुंबासाठी मदत मागितली. प्रशासकिय यंत्रणेला व गेवराईचे माजी आमदार अमरसिंह पंडीत यांनाही या घटनेविषयी माहिती दिली. मदतीचे आश्वासन मिळाले आहे बघुया काय होतय ते.
       चकलांब्याचेच माझे मित्र कैलाश शिंदे यांनीही सुरेश धस यांच्याशी संपर्क साधुन या संकटात सापडलेल्या कुटुंबियांसाठी मदत मागितली. सचिन खेडकर कॉम्रेड भैरवनाथ वाकळे ज्ञानेक्ष्वर मोहनराव लघाने तुमच्यामुळेही या कुटुंबियांपर्यंत मदत पोहोचत आहे. आज अशोकराव गुंजाळ त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तुंची व्यवस्था करत आहेत.अविनाश सानप हे ही मदतीसाठी तत्पर आहेत....... मित्रांनो सरकारी मदत त्यांना मिळेल तेव्हा मिळेल, आश्वासने हवेत विरतात कि काय माहित? परंतु तुम्ही सर्वांनी मिळुन संकटात सापडलेल्या कुटुंबाला जो मदतीचा हात देऊन माणुसकीचा धर्म निभावलात याचा मला सार्थ अभिमान आहे......तुमच्या या कार्याला माझा सलाम, मी तुमचा मित्र आहे ही भावना खुपच सुखावह आहे.... 💞💞💕
                                                       
                                                         
                                                           एस मुन्ना
                                                    बोधेगाव,ता.शेवगाव,
                                                    जिल्हा- अहमदनगर

No comments:

Post a Comment