Monday, April 6, 2020

कोरोनाच्या लढ्यासाठी मदरसाने देऊ केली इमारत j

कोरोनाच्या लढ्यासाठी मदरसाने देऊ केली इमारत 

इमारतीमध्ये विलगीकरण कक्ष उभारण्याचा जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव

जामिया मोहम्मदिया मदरसा बाराबाबळीचा पुढाकार
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-पाथर्डी रोड येथील जामिया इस्लामिया इशातुलउलूम अक्कलकुवा संचलित जामिया मोहम्मदिया मदरसा बाराबाबळी (ता. नगर) ने कोरोना विषाणूच्या लढ्यात आपले योगदान देण्यासाठी मदरसेची इमारत विलगीकरण कक्षासाठी (आयसोलेशन) देऊ केली आहे. मदरसेच्या ट्रस्टींनी सोमवार दि.6 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथील आपत्ती व्यवस्थापन केंद्रात निवासी उपजिल्हाधिकारी यांना सदरील इमारात ताब्यात घेऊन विलगीकरण कक्ष बनविण्याचे अधिकृत परवानगीचे पत्र दिले. यावेळी मदरसेचे व्यवस्थापक सय्यद सादिक गफ्फार, विश्‍वस्त मतीन सय्यद, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, आसिर पठाण उपस्थित होते.
देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जामिया मोहम्मदिया मदरसा बाराबाबळीच्या विश्‍वस्तांनी  एकमताने सदर मदरसाची इमारत प्रशासनाला विलगीकरण कक्षासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या मदरसामध्ये मुस्लिम समाजातील मुले धार्मिक शिक्षण घेत असतात. मुलांना सुट्टी असल्याने सदर इमारत मोकळी असून, प्रशासनाला ही इमारत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच येथे विलगीकरण कक्षात येणार्‍या नागरिकांसाठी जेवणाची सोय देखील करुन देण्याची तयारी मदरसाने दर्शवली आहे. कोरोना विरोधात चालू असलेल्या संघर्षात देशाबरोबर उभे राहून बाराबाबळीच्या मदरसाने या संघर्षाला पाठबळ दिले आहे.
शहरालगत नगर-पाथर्डी रोडवर असलेला बाराबाभळीचा मदरसा प्रशस्त व भव्य असून, येथे मोठ्या संख्येने रूम्स व वीज, पाण्याची सोय आहे. याचा प्रशासनाला उपयोग होणार असल्याची भावना व्यवस्थापक सय्यद सादिक गफ्फार यांनी व्यक्त केली. ईस्लाम धर्माने माणुसकीची शिकवण दिली असून, ही मानवजातीच्या असतित्वाची व संयमाची लढाई आहे. या लढ्यात बाराबाबळी मदरसेने दिलेल्या योगदानाचे मन्सूर शेख यांनी कौतुक केले.

No comments:

Post a Comment