Saturday, April 25, 2020

" जीसने चोच दि है, वह चारा भी देगां"



" जीसने चोच दि है, वह चारा भी देगां"



अहमदनगर शहराबद्दल अनेक बिरुदं मिरवली जातात. जसं की ऐतिहासिक शहर, महाराष्ट्राचे मध्य बिंदू, सर्वात मोठ्या जिल्ह्यचे ठिकाण वगैरे वगैरे....पण दुर्दैव नगरच की नगर शहराला मोठं खेडं असंही संबोधलं जातं...पण त्याच खरं वास्तव सिध्दार्थनगर, लालटाकी, संजयनगर, मुकुंदनगर, रामवाडी, इंदिरानगर, सर्जेपुरा, कोठी या ठिकाणच्या झोपडपट्टीत गेल्यावर कळतं....बहुतांश लोक असे कि दिवसभर काबाडकष्ट केलं तरच आपल्या कुटुंबाला खाऊ घालू शकतात. त्यातीलच एक गणीभाई....
      गणीभाई हे व्यवसायने सुतार....पण या फर्निचरच्या युगात कोण सुताराकडून काम करून घेतो? पण तरीही कोणाचे दरवाजे दुरुस्त कर, टेबल, खुर्ची बनव, तर कोणाच्या खिडक्या बसवं अशी छोटी मोठी कामे करून स्वत:च्या कुटुंबाची गुजराण चालु होती.
       पण कोरोना (COVID-19) या विषाणूंनं संपूर्ण जगाला थांबायला भाग पाडलंय.भारत सरकारने तर स़पुर्ण १००% लाॅकडाऊन जाहिर केलंय. आणि तेही ३७ दिवसांचं....ठप्प म्हणजे सगळं ठप्प.अशा परस्थितीत काय करावं या हातावर पोट असणाऱ्यांनी....
      अशावेळी सेवावस्तीत विद्यार्थ्यांचा आढावा घेत असताना गणीभाई यांच्या घरी  स्नेहालयाने आरोग्य, शिक्षण, संस्कार यासाठी निवड केलेल्या त्यांच्या दोन मुलींसाठी जाणे झाले. त्यावेळी त्यांच्या घरातील ते चित्रं पाहिलं...तर मी थक्कच झालो.... त्यांच घर म्हणजे 15 ते 20 वर्षांपूर्वी लाकडाच्या फळ्या, पत्रे व बाबूंच्या साहयाने उभे केलेले 10 बाय 10 चे खुराडेच, एकच छोटासा दरवाजा... हवा येण्यासाठी खिडकी नाही चिमणी नाही... दारामध्येच आंघोळीसाठी छोटीशी मोहरी केलेली...घरात फरशी नाही... सिमेंटचा वेडावाकडा जागोजागी फुटलेला कोबा.... घरात केवळ एकच 40 व्हेटचा पिवळा मंद दिवा, जो ओरडू ओरडू घरातील आठरा विश्वदारिद्र्यची कहाणी दाखवत होता... पूर्ण घरात 15 ते 20 आवश्यक तुटके फुटके स्टीलची भांडे, प्लास्टिक व जर्मनचे रिकामे डब्बे पाच सहा, दोन चेमटलेले हांडे, घरात किराणा नाही, भाजीपाला व धान्यही नाही...पाच लोकांसाठीचे जुनाट फाटलेले कपडे व काही बिछाने....कुटुंबात दोन मुली एक मुलगा व गणीभाई आणि त्यांची बायको, हे पाच लोकांचे कुटुंब त्यांची वाईट परिस्थिती आमच्या पासून लपवण्याचा पर्यँत करीत असल्याचे जाणवले, त्यातुन एक गोष्ट मात्र पक्की जाणवली की संपूर्ण कुटुंबाचा मागील बऱ्याच दिवसांपासून रोजा (उपवास) चालू होता. छोटी बालक कधी उपाशी तर कधी अर्धपोटी आहे. मी गणीभाईला म्हणालो, अरे घरात काहीच नाही तर घराच्या बाहेर पडून पहायचे ना.. किती तरी दाते काहीना काही वाटू राहिले... भाई खूप अदबीने म्हणाले, आज पर्यंत मी कधीही आल्हाह शिवाय कोणाच्याही समोर हात नाही पसरले... "जीसने चोच दि है... वह चारा भी देगां"...उसको सबकी फिकर है...
 त्यांचे सुकलेले निस्तेज चेहरे खुप काही सांगत होते. मी गृहभेट अर्धवट सोडून आगोदर शबाना बाजीला फोनवर गाठलं  व सदर परस्थिती सांगितली. अन् दखल घेणार नाही त्या शबाना बाजी कसल्या? अतिशय तत्परतेने त्यांनी शाहीदसर व इतर टीमला रामवाडीला पाठवुन शिधा किट माझ्या हाती पोहोच केले.
      त्यांच्या घरी जाऊन ज्यावेळी मी ते कीट त्यांच्या हाती ठेवलं त्यावेळी त्यांच्या समस्त कुटुंबाला जो आनंद झाला तो मी शब्दात व्यक्त नाही करू शकत. त्या ताकदीचे शब्दही माझ्याकडं नाहियेत. ज्यावेळी मी तिथुन निघालो तेव्हा ते फक्त एकच शब्द उच्चारु शकले. बेटा....अल्लाहने तुझे भेजा है....तेरा यह एहेसान...! आणि अश्रुंचा बांध मोकळा करून दिला....
      मी एक माध्यम होतो. त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं. पण स्नेहालय संस्था दिनदुबळ्यांसाठी, भुकेल्यासाठी किती उल्लेखनीय किती अद्वीतीय आणि समाजासाठी किती खोलवर जाऊन काम करते हे शब्दबद्ध नाही करता येणार. आणि ते माझ्या आवाक्यातही येत नाही.
    शेवटी मी एवढंच म्हणेन
"श्रेय घेण्याच्या बाबतीत जी माणसं अगतिक असतात देव त्यांच्याच हातुन मोठं कार्य घडवतो".

विक्रम भगत
शिक्षक रामवाडी बालभवन..

No comments:

Post a Comment