Tuesday, April 28, 2020

शेतकरी पुत्राचा जिद्दीतुन उभा रहिलेला संघर्षमयी थक्क करणारा प्रवास



        #प्रगतीपथावरील_युवा #लेख_क्रमांक_०६

           शेतकरी पुत्राचा जिद्दीतुन उभा रहिलेला                           संघर्षमयी थक्क करणारा प्रवास

          हाँटेलमधला_वेटर_ते_लोकसभेचा_उमेदवार  
          हे आहेत माझे मित्र साईनाथ घोरपडे (मु. पो. वैजु बाभुळगाव ,ता. पाथर्डी) गेल्या पंधरा वर्षापासुन नगरमध्ये खाणावळ चालवतात. नगरमधल्या सरकारी दवाखान्याजवळ त्यांचे कृष्णा भोजनालय आहे. आता त्यांच्या या भोजनालयाला सरकारमान्य #शिवभोजनालयाची मान्यता आहे. सरकारने ठरवुन दिलेल्या थाळ्या ते गरजुपर्यंत पोहोचवत आहेत परंतु त्याला वेळची, थाळ्यांची मर्यादा आहे. शिवथाळीची वेळ संपल्यानंतरही भटके, रुग्णांचे नातेवाईक, जेवण्याच्या शोधार्थ फिरणारांच्या सोयीसाठी साईनाथ भाऊंच्या माजी मेस सदस्यांनी केलेल्या सहकार्यातुन ते शिवथाळी सोडता रोज दीडशे लोकांना या लाँकडाऊनच्या कालावधीत जेऊ घालत आहेत. अहोरात्र त्यांचे हे काम सुरुच आहे, त्यांच्या दारात गेलेल्या माणसाला ते जेऊ घातल्याशिवाय येऊ देत नाहीत, पैसा असो वा नसो.....
      हाँटेलमधला वेटर ते २०१९ लोकसभेचा उमेदवार इथपर्यंतचा प्रवास त्यांचा नक्कीच सोपा नाही. अनेक खाच-खळग्यांचा त्यांना सामना करावा लागला आहे मी त्यांच्याशी फोन करुन सविस्तर माहिती घेतली असता इतरांना प्रेरणा मिळेल असा त्यांचा प्रवास आहे, ते सांगतात २००२ साली १०वी नापास झालो तेव्हा गाव सोडण्याचा निर्णय घेतला आणि  काहीतरी करून दाखवल्याबिगर गावात परतायचे नाही असे मनाशी ठरवुन नगर गाठले त्या साली नागापुर येथे १० रुपये रोजंदारीने हाँटेलमध्ये कामाची सुरवात झाली नंतर दिल्लीगेटमध्ये अपुर्वां भोजनालयात ४ महीने काम केले नंतर कृष्णा भोजनालय दादा साहेब वांढेकर यांच्या मेस मध्ये  काम केले हा कालावधी १५ महीन्याचा होता
नंतर २००३ च्या शेवटी कृष्णा भोजनालय चालवायला घेतले ते आज पर्यंत तन मन धनाने चालवत अाहे यासोबतच तरुण पिढीला व समाजाला आदर्श घेता येईल त्यासाठी कुंटूंबाची जबाबदारी सांभाळुन रंजल्या-गांजलेल्यांसाठी सामाजिक काम करण्याची खुप आवड लागली १०वर्षापासुन जन्मदिवस साजरा करतो दर वर्षी सहा ते सात हजार रूपयाची काहीतरी _ अनाथ आश्रमात तेथे लहान मुलांना कधी टॉवेल कधी पैड कधी ब्लँकेट तर कधी कंपास  जी गरज असेल तेथील त्या प्रमाणे वाटप करत असतो तसे गावामधील खुप धोकादायक ९ परस आडावर खुप भक्कम असा मोठा सेफ्टी  डोर बसवला.
साईनाथ घोरपडे

    दरवर्षी दिंडी मधे गावतील सर्व लोकांना सर्व दिंडीमधे लागणारे मेडीसीन वाटप केले जाते तसे पाच दिवस पुर्ण स्वयंपाक बनवण्याची जबाबदारी तसे अल्प आहार आमच्या शिवशक्ती मंडळाच्या वतीने केला जातो
तसेच मंडळाच्या माध्यामातुन २०१९ ला दुष्काळ पडला त्यावेळेस स्वखर्चाने व लोकहभागातुन भोस येथे छंत्रपती संभाजी महाराज शेतकरी चारा छावणी सुरू करून शेतकऱ्याचे पशुधन जगवण्याचे मोठे कार्य केले तसेच भोजनलयाच्या माध्यमातुन सर्वांना सहकार्य चालु आहे संध्या २६ जानेवारी पासुन शिव भोजन मंजुरी मिळाली आहे सध्या  सकाळी शिव भोजनाच्या माध्यामातुन ५०० लोकांची भुक भागविली जाते व संध्याकाळी संध्या लॉक डाऊन काळा माझ्या मदतीवर व लोकांच्या सहकार्य वर रोज ५० लोकांना सिव्हील येथे जेवन देत आहे आणी २४ तारखेपासुन ते ३ मे पर्यत संध्याकाळी रोज १४० लोकांसाठी आपल्या नगरमधील बीसीएस एमसीएस नगरी ग्रप यांच्या व कृष्णा भोजनालय यांच्या वतीने रोज संध्याकाळी सिव्हील येथील बाहेर गावातील आलेल्या लोकांची जेवणाची व्यवस्था केली आहे.
         राजकारणात देखील पारदर्शिता यावी व शेतकरी मुलगा देखील पैशाविना निवडणुक लाचार न होता लढु शकतो हे दाखवुन दिले. ! २०१९ लोकसभेची निवडणुक धनशक्ती विरोधात सर्वसामान्य शेतकरीपुत्र अशी अपक्ष  लढलो.२०१७ साली पंचायत समिती निवडणुक क्रांतीकारी शेतकरी पक्षाकडुन करंजी गटातुन लढलो. निष्कलंक पणे या निवडणुक लढवुन दहशत, दरारा, या गोष्टींचा बिमोड केला. येणा-या काळात नव्या जोमाने समाजकार्यात स्वतःला झोकुन देण्याचा मानसआहे त्यासाठी नगर पासुन २० किमी अंतरावर मराठवाडी गावामध्ये तीन एक्कर जागा घेतली आहे लवकरच तेथील काही क्षेत्रावर शेतकरी भवन, शेतकरी पुत्रांसाठी सदनिका, अभ्यासिकेचा निर्माण करण्यात येणार असल्याचेे ते म्हणाले.    
        साईनाथभाऊ समाजासाठी आपण देत असलेल्या योगदानाचे मुल्यमापन होऊ शकत नाही. स्वतःसाठी सारेच जगतात माणुसकीच्या नात्याने समाजासाठी जो झटतो, लढतो त्याला माझा सलाम आहे. आपल्या भविष्यातील नियोजनासाठी आपणांस शुभेच्छा🌷🌸🌹🌺

#एस_मुन्ना_७_०_५_७_०_५_५_५_८_५

No comments:

Post a Comment