Sunday, April 12, 2020

मुकुंदनगर उपनगरात नागरी सुविधा पुरविनारी यंत्रनेत नियोजनाचा अभावमुळे नागरिक त्रस्त



                           मनपा चा भाजीपाला

मुकुंदनगर उपनगरात नागरी सुविधा पुरविनारी यंत्रनेत नियोजनाचा अभावमुळे नागरिक त्रस्त

अहमदनगर - अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील मुकुंदनगर उपनागरातील नागरिकांची हॉटस्पॉट लागू करण्यात आल्याने,आपणा कडून  उपलब्ध करण्यात आलेली व्यवस्था ही व्यावस्थापनाच्या नियोजन अभावापायी कूचकामी ठरली आहे. दि.१० एप्रिल २०२० ते १४ एप्रिल २०२० पर्यंत हॉटस्पॉट जाहिर केल्या नंतर आपणा कडूनच अत्यावश्यक सेवा उपलब्ध करण्याचे जाहिर करण्यात आले. सेवेसाठी काही फोन आणि मोबाइल नंबर जाहिर करण्यात आले.
           हॉटस्पॉट ची सक्ति मुकुंदनगरच्या नागरिकांनी देशहितासाठी स्वीकारली आणि सगळ्यांनी घराबाहेर न पडण्याचे काटेकोर पणे पालन आज पर्यंत केले आहे. असे असताना १० एप्रिल पासून मुकुंदनगर मधील नागरिक गरजेची वस्तु साठी फोन करत असताना व्यस्त आणि सेवेकरी कर्मचारी यांचे मोबाईल बंद असतात.या बाबत मुकुंदनगरच्या नागरिकांची आहे.आज दि.१२ एप्रिल २०२० रोजी दूध आणले परंतु भाजीपाला साठी तीन कांदे, तीन बटाटे, थोड़ीसी गवार आणि मिरची, काही विचित्र पाकिट बनवले.आणि त्यातही पोलिसी अत्याचार ,घालुन पाडुन बोलने आणि हाकलूंन लावणे.महिन्याचा बाजार खरेदी करायचा का?महिलांशी अश्या उद्धट बोलत असल्याने बऱ्याच महिला काही खरेदी न करता परतल्या आहेत.किराना  बाबत कोणताच निर्णय घेतला गेला नाही असे संबंधित जबाबदारांचे म्हणणे आहे.दोन दिवसानंतर दूध आणि पाच दिवसानंतर भाजीपाला असे नियोजन असेल तर असे जाणून बुजुन अल्पसंख्यक बहुल मुकुंदनगरच्या बाबतीत होत आहे अशी शंका निर्माण होत आहे.त्यास कारणही ठोस आहे.हेल्पलाइन फोन वरील मनपा कर्मचारी याने केलेले वादग्रस्त वक्तव्य.अशा मानसिकतामुळे अत्यावश्यक सेवा ही मकुंदनगर वासियांसाठी अत्यावस्थ ठरत आहे.
      लहानबाळा साठी दूध,दाळ भात,वृद्धाचे मधुमेह, रक्तादाब सारख्या अनेक व्याधि नुसार लागणारे वेळेवर लागनारे जेवन जर अश्या आपल्या हलगर्जीपूर्ण सेवेमुळे मिळणार नसेल तर आपण गाम्भीर्यणे विचार करुण परिसरातील दुकानांना वेळचे बंधन देवून,पूर्ववत चालू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी द्यावे.मुकुंदनगरचे नागरिक सोशल डिस्टनिंग चे आणि संचार बंदीचे पालन करतील.
          मनापाचे कर्मचारी चे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावी आणि  निलंबनाची कारवाई करण्यात यावी.ज्या मुळे अश्या विकृतिस आळा बसेल. सम्बंधित रेकॉर्डिंग ही आपणास पाठवत आहे.
आपण आमच्या तकरारीची दखल घ्याल.मनपा अकार्यक्षम ठरल्याने हॉटस्पॉट शिथिल करण्यात यावे ही विनंती मुकुंदनगर चे नागरिकांचे वतीने करण्यात येत आहे.
                         हेल्पलाइन चा बोजवारा


 

,


             

No comments:

Post a Comment