Wednesday, April 22, 2020

तिचा हा "thank you" आम्हां कार्यकर्त्यांना ही बारा हत्तीचं बळ देऊन गेलं....


                                        न्यूज व्हलुज


तिचा हा "thank you" आम्हां कार्यकर्त्यांना ही बारा हत्तीचं बळ देऊन गेलं....

मदत लहान, कृतज्ञता महान!

            अहमदनगर शहराच्या मध्यवर्ती असलेली एक मोठी झोपडपट्टी म्हणजे "लालटाकी"...खरं तर हे नाव नगरकरांसाठी नवे नाही.... कारण ही वस्ती अनेक कारणांमुळे नेहमीच प्रसिद्ध असते. अनेक मागासवर्गीय जाती धर्माचे दहा हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली वस्ती. येथे दररोज पोलीस व गुंडांची ये जा चालू असते, पूर्वी दारू पिऊन भांडण, मारामारी, शिव्या-गाळ, सर्व दोन नंबरचे बेकायदेशीर धंदेचा मोठा अड्डा, एक गुन्हेगारांची वस्ती म्हणजे लालटाकी झोपडपट्टी अशी ओळ्ख आता पुसून बालभवनाने हुशार, अभ्यासू व खेळाडूंची सेवावस्ती अशी घडवली आहे....
या वस्तीत गोंधळी समाजाची 40 कुटुंब अतिक्रमण करून मागील तीन पिढ्यांपासून राहतात, त्यातील आमचे उत्कर्ष बालभवनची लाभार्थी प्रतिक्षा वाकोडेचे कुटुंब, प्रतिक्षाचे वय जेमतेम 9 वर्ष, इयत्ता चौथीमध्ये पंचशील शाळेत शिकते, वडील 4 वर्षांपूर्वी हार्टफेल झाल्यामुळे देवाघरी गेले, माघे विधवा आई रेणुका वय 27 वर्ष, दोन छोटी बहीण कोमल 6 वर्षाची तर  राधा 4 वर्षाची.... वडील गेले तेव्हा आईच्या पोटात होती राधा....घरामध्ये वडिलांची अंध आई वय असेल 65 च्या जवळपास हे सर्व पाच लोकांचे कुटुंब, एका दहा बाय पंधराच्या जागेत लाकडी फळ्या, अर्धी कच्चीभिंत, जुन्या गळके पत्र्यावर फाटके प्लास्टिक कव्हरने बांधलेले, साड्यांची आतून सजावट केलेल्या घरात राहतात.... या समाजाचा मुख्य व्यवसाय म्हणजे दारोदारी जावून भांडे विकून कपडे गोळा करायचे आणि या कपड्यांचे मोठं-मोठे गाठूडे बांधायचे व मुंबईला जाऊन विकून यायचे, यातून जे पैसे येतील त्यावर कुटूंबाला खायला घालायचे, प्रतिक्षाच्या आईने पण नवरा गेल्यानंतर हाच व्यवसाय स्वीकारला, मयतीच्या पाचव्याच दिवशी,  सोबत राधाला कड्यावर घेऊन ती कपडे गोळा करण्यासाठी निघाली होती, पण ती या व्यवसायात नवीन असल्यामुळे फारसा धंदा होत नव्हता, तिच्या नाजूक परिस्थिती बाबत आमच्या पिअर बबिता व कमला ताईकडून माहिती मिळाल्यावर स्नेहालयचे विश्वस्त फिरोजभाई तांबटकर यांनी रेणुकाताईला संजय गांधी विधवा महिला ही सरकारी योजना काढून दिली, त्यातून तिला महिन्याला 800 रुपये पेन्शन नियमित मिळते. जयप्रकाश संचेती सरांना माहिती मिळाल्यावर त्यांनी रेणुकाताईला महिना भर पुरेल एव्हडा किराणा व भाजीपाला स्नेहालय तर्फे पोहच केला होता. प्रतिक्षाच्या कुटूंबाचे सर्व घडाल्याच चक्र अडखळत पण सुरळीतपणे चाललं होतं...  पण अचानक आलेल्या करोणा या महामारी मुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले, सर्व जग थांबले, त्याला लालटाकी काय अपवाद राहणार.
" कही मंदिरोमे दिया नही,
       कही मस्जिदोमे दुवा नही...
             मेरे शहर मे है खुदा बहोत हैं,
                 मगर आदमी का पता नही"...
 रेणुकाताई सारख्या कुटुंब ज्यांचे हातावर पोट असतं, घरात आगोदरच आठराविश्व दारिद्र्य असतं त्यांच्या बद्द्ल काय बोलायचं...आम्ही कार्यकर्त्यांनी वर्क फॉर होम सुरू केलं होतं... प्रतिक्षाला माहिती घेण्यासाठी फोन केला, तेव्हा कुटुंबाची होणारी हेळसांड समजली, आमचे हक्काचे डॉक्टर अंशु व महेश मुळे यांना फोनद्वारे माहिती कळवली, तेव्हा ताबडतोब दोघे दाम्पत्य खाण्याचे डब्बे घेऊन रेणुकाताईच्या घरी पोहचले व पुढील काही दिवसांचीही जेवणाची व्यवस्था लावून दिली. बालभवन संचालिका शबाना शेख यांनी "स्नेहालय सहयोग किट" म्हणजेच कोरडा शिदा पाठवला. त्यामुळे ताईंच्या स्वयंपाक बनवण्याच्या बऱ्याच अडचणी दूर झाल्या, चिमुकल्या मुलींना भरपेट दोन वेळा नियमितपणे खायला मिळायला लागले.... शिक्षण समन्वयक संगीता सानप यांनी या कुटूंबाचे नाव आर्थिक सहयोग यादीसाठी सुचवून मान्य ही करून घेतले, दोन दिवसांपूर्वीच स्नेहालयचे अध्यक्ष संजय गुगळे, सचिव राजीव गुजर, बालभवनचे संचालक संजय बंदीष्टी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स कॉल द्वारे प्रतिक्षाच्या कुटूंबाशी संवाद साधला, व त्यांना 5000/- रुपयेचा आर्थिक सहयोग त्यांच्या खात्यात वर्ग केला, यावेळी रेणुकाताई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की, 'नवरा गेल्यानंतर आमच्या समाजाने फक्त सांत्वन केले', पण माझ्या स्नेहालय बालभवन परिवाराने नेहमीच, कोणत्याही संकटात मला व माझ्या तीन मुलींना मोलाचा आधार व खंबीर साथ दिली, व यामुळेच मला जगण्या व लढण्यासाठी बारा हत्तीचे बळ मिळते....मी खूप मेहनत करेल व या मुलींना स्वतः च्या पायावर उभे करेल.... तसेच इतर गरजवंत लोकांना पण माझ्या भाकरीचा एक चतकोर हिस्सा का होईना तो देईल....
प्रतिक्षाने हसत, लाजत केवळ एकच 'लाख मोलाच शब्द उच्चारल'... "thank you"....
तिचा हा "thank you" आम्हां कार्यकर्त्यांना ही बारा हत्तीचं बळ देऊन गेलं.....
शेवटी एक ओळ आठवते...
"कुछ सिखाकर ये दौर भी गुजर जायेगा..
फिर एक बार हर इंसान मुस्कुराएगा...
मायूस न होना मेरे दोस्तों इस बुरे वक़्त से,
कल, आज है और आज, कल हो जाएगा"...

रुबिना शेख
समनव्यक
उत्कर्ष बालभवन, लालटाकी..         

No comments:

Post a Comment