Tuesday, April 14, 2020

मुकुंदनगर भागातील नागरिकांची मुस्कटदाबी





हॉटस्पॉटचा वाढिव कालावधीत प्रशासनाची जीवनावश्यक वस्तु पुरविन्यास अकार्यक्षमता,मानवाधिकाराचे उलंघन!

मुकुंदनगर भागातील नागरिकांची मुस्कटदाबी

अहमदनगर -आपण मुकुंदनगर उपनागरातील
 हॉटस्पॉटची सक्ति मुकुंदनगरच्या नागरिकांनी देशहितासाठी स्वीकारली आणि सगळ्यांनी घराबाहेर न पडण्याचे काटेकोर पणे पालन आज पर्यंत केले आहे आणि यापुढे ही दि.२३ एप्रिल २०२० पर्यंत करत राहू असे असताना १० एप्रिल ते १४ एप्रिल २०२० पर्यंत मुकुंदनगर मधील नागरिक दूध, भाजीपाला आणि भाजीपाला पुरवठा सेवा पूर्णपणे कुचकामी ठरल्या आहेत. सदरची सेवा देण्याचा आपला उपक्रम भाव चांगला आहे. हे मान्य असले तरी,त्यातील त्रुटी पहाता तो योग्य ठरत नाही.त्या त्रुटी बाबत जर शासन गंभीरपणे विचार करुण आपल्या विशेष अधिकाराचा वापर करुण निर्णय मुकुंदनगर नागरिकांचे हितास बाधा पोहचवीणारे असेल तर ते मुकुंदनगर वासियांचे मानवाधिकाराचे उल्लंघन ठरेल.अशी निवेदना व्दारा तकरार जिल्हाधिकारी यांना मुकुंदनगर च्या नागरिकाच्या वतीने करण्यात आली.
           आपल्या सेवतील त्रुटीचा तपसिल
१) हेल्पलाइनचा फसलेला बोजवारा,नागरिकांनी औषधासाठी आपणास केलेला फोन घेतलेली दखल घेतली आणि आपण तात्काळ घरपोच औषधे कौतुकास पात्र आहे.पण शासकीय यंत्रनेचे अपयश ठरते. आज दिवसाखेर ती मुकुंदनगर वासियां साठी मानसिक त्रास देणारी ठरलेली आहे.दोन दिवसा पूर्वी गरोदर महिला ची समस्या निर्माण झाली होती. मुकुंदनगरची महिला असल्याने एडमिट करुन घेण्यास हॉस्पिटल तैयार नव्हते कारण आपण घोषित केलेले हॉटस्पॉट लॉक डाउन या कारणाने अछूतपनाची वागणूक मिळत आहे.या कारणाने एका नवजात बालकाचा मृत्यु झालेला आहे.वृधास अनेक आजार असतात,लहान मुलाना उन्हाळ्यात अनेक शारारिक समस्या निर्माण होतात,अश्यावेळी वेळेवर औषधोपचार आणि वैद्यकीय सेवा न मिळाल्यास मरण येवू शकते याचा विचार करुण मेडिकल आणि दवाखाने सुरु करण्यात यावे.
२) मुकुंदनगर परिसर बाबत भययुक्त वातावरण हॉटस्पॉट घोषित केल्याकारणाने आपण पुरवठासाठी करण्या करीता नियुक्त केलेल्या बहुतेक कर्मचारी भययुक्त मानसिकतेने ग्रासलेला असून कार्यात उदासीनते मुळे नागरिकाना चीड़चीड़ सहन करावी लागते.
३) एका दुधावाल्याचे वेगवेगळ्या दराचे हे रोजच्या रोजनदारी ठरते. १०० ग्राम पासून म्हणजेच एक वेळेचे चाहा पासून घ्यावे लागते,त्यात उधारी ही सतत असते.असे असताना आपण राजहंस दूधच ते ५०० ग्राम २५ रु.दर .लहान बाळाना गाईचे दूध पाजले जातात.म्हशीचे जड़ असते.आपल्या हॉटस्पॉट मुळे बाहेर जाता येत नाही. आपल्या सेवेकारांना ते कळणार नाही.
४) भाजीपाला हा चांगल्या प्रतिचा असला पाहिजे.जर आपण दाम देत असाल.ही खरेदी ही रोजनदारी वर अवलंबून आहे.बरीच खरेदी ही रोज, आठवडे आणि महिन्याचे पगारा वर ठरते.उधारीवर चालते.बरेच डोळे आपल्या गाड़ी कड़े पाहतात.कधी लॉक डाउन संपेल या आशेने.बरेच जन संध्याकाळी मंगलवार बाजारात जातात कारण भाजीपाला स्वस्त मिळेल या आशेने.
५) साहेब आपण किराना दुकान,बे😢करी,मेडिकल, दवाखाने बंद केले.किराणा दुकानातून उधारीवर किराणा हे तर पाचविला पूजलेले असते.सर्वे करा, करोना लॉकडाउन पासून ते हॉट स्पॉट लागू होण्यापर्यंत  दुकानदाराची  बऱ्याच लोकांची उधारी डायरी भरलेली आहे.त्या डायरीत लहान बाळासाठी बिस्किट, टूथपेस्ट,दाळ, तांदूळ,गहु,ज्वारी,बाजारी,साखर,चाहा पावडर सगळे लिहिलेले आहे.कारण बऱ्याच जनाचे घर मालकीचे आहे.ज्यांचे घर भाडयाचे आहे.त्यांचे काय?लॉक डाउन रोजगार नाही तर पैसा नाही.आपण उधार देणार नाही.हॉट स्पॉट घोषित केल्याकारणाने मुकुंदनगर परिसरातील दुकान उघड़ी नाही. जरा लोकांच्या घरात डोकवा कोणाच्या घरात काय काय नाही ते बघा. आपल्या हॉटस्पॉट घोषित केल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया की,बिस्किटचे रैपर ही दिसेनासे झाले.
           आपण आपल्या अधिकाराचा वापर करुण मुकुंदनगरचे हॉटस्पॉटची मुदत वाढवली .बाहेरचा कोणी आत येणार नाही आणि आतले कोणी बाहेर जाणार नाही.असे असताना बन्दोबस्ता साथी येणारा पुलिस असो वा अत्यावश्यक सेवेसाठी  येणारे मनपा कामगार हे बाहेरुन कोरोना बाधित होऊन येणार नाही किंवा येथून बाधित होवून जाणार नाही याला आपण नाकारु शकत नाही.सोशल डिस्टनिंग चे उलंघन अनावधाने होते यास कोणीही नाकारु शकत नाही.कारण अनेक पुलिस इतर कर्मचारी करोना बाधित झाल्याचे बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत.आपणास विनम्रतापूर्वक विनंती करण्यात येते की हॉटस्पॉट मध्ये काहीवप्रमानात शिथिल करण्यात येवून,किराणा दुकान,दूध डेरी, मेडिकल, दवाखाने आदी अत्यावश्य सेवेस वेळेचे बंधन देवून नियम अटी नुसार सुरु करण्यात यावी.आपण घोषित केलेले हॉटस्पॉट विचार करून शिथिल कराल अशी मागणी
समस्त मुकुंदनगर रहिवासी यांच्या वतीने करण्यात येत आहे.


,

No comments:

Post a Comment