Sunday, April 26, 2020

फिजूल खर्च टाळा...




                  फिजूल खर्च टाळा...

भावांनो.....

जी काही आर्थिक शिल्लक असेल ती वाचवून रहा. रमजान आणि ईद साठी अंधाधुंद खरेदी करून मोकळे होऊ नका. येणारे दिवस वाईट असणार आहेत. खरा खेळ तर कोरोना नंतर सुरू होईल. काही गावामध्ये दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे ती यासाठी की मोठ्या व्यापाऱ्यांचा जो पैसा स्टॉक मध्ये अडकला आहे तो मोकळा व्हावा. हा वर्ग सत्ताधारी पक्षाचा सर्वात मोठा देणगीदार आहे म्हणून त्याच्या फायद्यासाठी हा निर्णय आहे हे समजून घ्या.

जसे कोरोनाच्या पहिल्या टप्प्या मध्ये सर्व जबाबदारी जमाती वर टाकली गेली तशी दुसऱ्या येणाऱ्या टप्प्याची जबाबदारी तुम्ही खरेदी साठी गर्दी केली किंवा एखादा दुकानदार नंतर कोरोना पॉज़िटिव निघाला तर सर्व समाजावर टाकली जाणार आहे.

येणारे सहा महिने फार वाईट असणार आहेत हे डोक्यात ठेवा. त्यामुळे ईद अतिशय साधेपणाने साजरी करा आणि पैसे वाचवून ठेवा. काय होतेय जर एखाद्या ईद ला नवीन कपडे नाही घेतले, चप्पल, शूज ई. वस्तू नही घेतल्या तर ? हेच पैसे पुढे कामाला येतील.

आणखी एक ईद साठी अंधाधुंद खर्च करू नका पण जकात जास्तीत जास्त तुमच्या आजूबाजूचे गोरगरीब, तुमचे गरीब नातेवाईक यांचे पर्यंत पोहोचवा. त्यांच्या साठी पुढील काही महिने फार अवघड असणार आहेत. मदरसे पुढील काही महिने बंदच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांना दिली जाणारी जकात ची रक्कम सुद्धा तुमच्या आजूबाजूच्या गोरगरीबांना द्या.

येणारा काळ कठीण असणार आहे. फिजूलखर्च टाळा...पैसे वाचवा....आजूबाजूच्या गोरगरीब, गरजू लोकांची मदत करा..
एस मुन्ना,
बोधेगाव, शेवगाव.

No comments:

Post a Comment