Saturday, May 2, 2020

लॉकडाउन मुळे घरात पैश्या ची चनचन, त्यात दारुचे दुकान आणि पान टपरी सुरु करण्याचा सरकारचा निर्णय...



 लॉकडाउन मुळे घरात पैश्या ची चनचन, त्यात दारुचे  दुकान आणि पान टपरी सुरु करण्याचा सरकारचा  निर्णय...

दारुचे दुकान आणि पान टपरी सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकार मार्फत घेण्यात आला.ग्रीन झोन साठी लागू आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार वाईन्स शॉपना परवानगी देण्यात आली आहे. मात्र ग्रीन झोनमध्येच ही परवानगी असणार आहे. तसेच वाईन्समधून खरेदी करण्या साठी काही नियमावली घालून दिली आहे. दुकानात एकावेळी फक्त ५ लोकांनाच उभे राहण्याची परवानगी असेल. तसेच दोन गिऱ्हाईकांमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवावे लागणार आहे.
दरम्यान मॉल्स आणि मार्केटिंग कॉम्प्लेक्स मधील वाईन्स शॉप्सना परवानगी देण्यात आलेली नाही. त्या व्यतिरीक्त इतर ठिकाणी असलेल्या दुकांना परवानगी देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊन आता १७ मे पर्यंत वाढवले असले तरी यादरम्यान ग्रीन झोन असलेल्या ठिकाणी ही दुकाने चालू करता येणार आहेत.
ग्रीन झोन मध्ये रोजगार पूर्वत करण्यात यावे.लॉकडाउन नागरिकांची आर्थिक परिस्थिति डाउन झालेली आहे.त्यात सरकारचा निर्णय हा प्रपंचासाथी विशेषता महिलासाठी त्रासदायक ठरणार आहे. नजदीक च्या काळात शाळाही उघडनार आहे.या साथी लागणाऱ्या खर्च ही मोठी चिंताजनक बाब आहे,असा सुर पालकातुन निघत आहे.

आम्हाला ऑरेंज झोन टोडायचे आणि ग्रीन मध्ये जायचे आहे!




                      आपला अहमदनगर जिल्हा
एक अपील सर्वासाठी,

आम्हाला ऑरेंज झोन टोडायचे आणि ग्रीन मध्ये जायचे आहे!

आपल्या अहमदनगर  जिल्याच्या सीमेवरील, पुणे, औरंगाबाद, ठाणे, सोलापूर नाशिक हे जिल्हे रेड झोन मध्ये आहेत तर अहमदनगर जिल्हा ऑरेंज झोन मध्ये आहे. 3 मे नंतर काही प्रमाणात सूट मिळेल पण काळजी घ्यावी लागेल, झुंबड करून नाही चालणार, तिन्ही बाजूच्या सीमेवर रेड झोन जिल्हे आहेत, काळजी घ्या, नाहीतर आपलं अहमदनगर जिल्हा पण रेड झोन होईल आणि पुन्हा पूर्ण लॉकडाउन सुरु होईल. काळजी घ्या. आम्हाला ऑरेंज झोन टोडायचे आणि ग्रीन मध्ये जायचे आहे.प्रवास शक्यतो टाळावा, गाव पातळीवर कामे करावी, जिल्हा बाहेर प्रवास बंद असेल, लपून छपुन प्रयत्न करू नका, (नाहीतर पोलीस आहेतच ) आपल्या अहमदनगर च्या प्रशासन ने खूप छान काम केले आहे, त्याला आपण ही साथ देणे गरजेचे आहे, एक सुज्ञ नागरिक, व सुज्ञ अहमदनगरकर म्हणून आपली जबाबदारी पार पाडा. जास्त लिहीत नाही, बाकी ची काळजी, हाथ धुणे, अंतर ठेवणे, इ. आपण जाणता, लक्ष पूर्वक प्रयत्न करा.
                      आपलाच अहमदनगरकर.

                      फिरोज शेख (अहमदनगर)

Friday, May 1, 2020

रमजानुल मुबारक - ८ *कष्टात सवलत दयावी...*



                रमजानुल मुबारक - ८

              *कष्टात सवलत दयावी...*

पवित्र रमजान महिन्यांमध्ये प्रत्येक स्त्री पुरुषाने रोजे धरणे अनिवार्य आहे . रोजे धरून आपले दैनंदिन कामकाज केले जाते . उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चौदा ते पंधरा तासांचा रोजा धरणे तसे कष्टप्रद काम आहे . परंतु अल्लाहवरील श्रद्धा हे कष्ट लिलया पेलण्यास भक्तांना प्रोत्साहित करीत असते . रोजे धरून समाजातील अनेक लोक आपले दैनंदिन कामकाज पार पाडतात .
 या महिन्यात मालकांनी आपल्या रोजे धरणाऱ्या नोकरांना कामात सवलत द्यावी, फार कष्ट करण्यापासून थोडी मदत करावी आणि त्यांच्यावर वाजवीपेक्षा कामाचे जास्त ओझे टाकू नयेअशी शिकवण हजरत पैगंबरांनी दिली आहे.जी व्यक्ती रोजे धरून आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी दिवसभर कष्ट करते व सायंकाळी घरी येऊन आपल्या कुटुंबाबरोबर रोजा सोडते, अशा कष्टकऱ्यांना बद्दल ईश्वराला खूप आनंद होतो. कष्टाच्या कमाईतून ज्यावेळी असा रोजेदार रोजा ईफ्तार करतो त्यावेळी त्याचा आनंद गगनात मावेनासा असतो.रमजान महिन्यामध्ये आपले नियमित कामकाज करून अल्लाहची मनोभावे प्रार्थना केली जाते. ती करताना प्रार्थनेचे सर्व संकेत पाळले जातात. अल्लाह तआला ने  कुरआनमध्ये म्हटले आहे कि रोजा मेरे लिये है और मै ही उसका  बदला दूंगा, म्हणजे रोजाचा मोबदला साक्षात अल्लाह देणार आहे. त्यामुळे प्रत्येक जण अतिशय श्रद्धेने रमजानचे रोजे पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो.

 काल जगभरामध्ये कामगार दिन म्हणजे मजदूर दिवस साजरा करण्यात आला. मजूर आहेत म्हणून मालकाला महत्त्व आहे. मजूर नसते तर या जगाची अवस्था काय झाली असती.हजरत पैगंबरांनी मजुरांबद्दल अत्यंत दयाळू भावना व्यक्त केली आहे. ज्यावेळी एखादा मजूर  कष्ट करतो, त्यावेळी त्याचे संपूर्ण अंग घामाने भिजलेले असते.ज्यावेळी तो त्याचे काम पूर्ण करतो, त्यावेळी त्याला मजुरीची अपेक्षा असते. प्रेषित हजरत पैगंबरांनी म्हटले आहे की, मजुरांची मजुरी त्याच्या अंगावरील घाम सुकण्यापूर्वी आदा करा .इस्लामने कष्टकऱ्यांचा नेहमी आदर केला आहे. हजरत अबूबकर सिद्दिक ज्या वेळी खलिफा ( बादशाह )झाले.त्यावेळी त्यांना विचारलं गेलं की तुमची मजुरी (मानधन ) काय ?  ते म्हणाले की जे एका मजुराला दिले जाते तेच.त्या मजुरीत तुमचे भागेल का ?असा प्रश्न जेव्हा त्यांना केला गेला, तेव्हा त्यांनी उत्तर दिले कि जर नाही भागले तर मी आधी मजुरांच्या मजुरीत वाढ करील आणि नंतर माझे मानधन वाढविन .
आज आपण पाहतो की राज्यकर्ते धडाधड आपल्या फायद्याच्या सवलती सत्तेच्या जोरावर मंजूर करून घेतात . लोकप्रतिनिधींना लोकांची नाही तर स्वतःची जास्त काळजी वाटते . सत्तेचा फायदा स्वतःसाठी किती आणि कसा करून घेता येईल याकडेच सर्वांचा कल असतो . परंतु इस्लाम धर्माला हे मान्य नाही . लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो. त्याने जनतेची सेवा करायची असते. जनतेच्या सोयी-सवलती पाहायच्या असतात. ही शिकवण हजरत पैगंबरांनी दिली आहे.
दुसरे खलिफा हजरत उमर फारूक म्हणायचे कि दजला नदीच्या काठी जर एखादा कुत्रा भुकेने मरून पडला तर त्याची जबाबदारी उमर वर राहील . एवढी काळजी त्याकाळात घेतली जात होती . आजचे लोकप्रतिनिधी स्वतःचे कर्तव्य विसरले आहेत . परमार्था ऐवजी स्वार्थाला प्राधान्य दिले जात आहे . त्यामुळे ईश्वर, अल्लाह नाराज झाला असून कोरूना सारख्या आजाराच्या रूपाने तो आता आपल्या मागे लागला आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे.गोरगरीब, कष्टकरी, लाचार, मजबूर अशा घटकांना न्याय मिळवून दिला पाहिजे. ( क्रमशः)
*सलीमखान पठाण*
*9226408082*

पुस्तक चाळताना.....



पुस्तक चाळताना.....

आज हातात एक २००४ चे एक विशेषांक हाती आले,पाने चाळताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेला 'धाकटा भाऊ' या लेखातील चौकटी वर गेली.
             जेम्स बॉन्ड, मी आणि राजा
राज्यात शिवसेना - भाजपाच सरकार असताना मला आणि राजाला चांगलीच सिक्युरिटी होती.बऱ्याच दिवासात जेम्स बॉन्डचा पिक्चर आम्ही दोघांनी बघितला नव्हता आणि योगायोगने तो बान्द्रयालाच एका टॉकीज मध्ये लागला. मी आणि राजा दोघेही तो बघायला गेलो.सुरक्षाव्यवस्थे मुळे थिएटर सार रिकाम होत. आम्ही सीटवर जाऊन बसलो. पिक्चर सुरु झाला आणि नंतर पब्लिकला थिएटर मध्ये सोडायला सुरवात झाली.थिएटर मध्ये पोहचायाच्या आत सिनेमा सुरु झाल्याच पाहुन पब्लिक वैतागल.आरडाओरड सुरु झाली.शिटया वाजु लागल्या, जेम्स बॉन्डचा पिक्चर म्हणजे सुरु झाला.शिटया वाजु लागल्या जेम्स बॉन्डचा पिक्चर म्हणजे सुरवात कधी चुकवू नका आणि शेवट कोणाला सांगू नका. अस जाहिरातीच म्हटलेल असत.मग लोकाग्रहास्तव लोकांना पुन्हा पहिल्यापासून पिक्चर दाखवण थिएटर मालकाला भाग पडले आणि आम्हा दोघांनी जेम्स बॉन्डची सुरवात बघायचा आनंद दोनदा लूटला!"

न्यूज व्हलुज

रमजानुल मुबारक - ७ *कोरोना आणि वजु*






रमजानुल मुबारक - ७

*कोरोना आणि वजु*
इस्लाम धर्माच्या मूलतत्त्वांमध्ये नमाज हे एक महत्त्वाचे तत्त्व आहे. दिवसातून दररोज पाच वेळा प्रत्येक मुस्लिम नागरिकांना नमाज पठण केले पाहिजे अशी शिकवण हजरत पैगंबरांनी दिलेली आहे.सकाळी फजर, दुपारी जोहर, सूर्यास्ता पूर्वी असर, सूर्यास्ताच्या वेळी मगरिब आणि रात्री ईशा. अश्या पाच वेळी नमाज दररोज पठण केली जाते. नमाजसाठी पूर्वतयारी म्हणून प्रत्येक वेळी तोंड हात पाय धुतले जातात त्याला वजू करणे असे म्हणतात. साडेचौदाशे वर्षांपूर्वी रुढ झालेली ही प्रथा आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किती योग्य आहे याची प्रचिती सध्या येत आहे. कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने वारंवार आपले तोंड, हात, नाक धुतले पाहिजे असे डॉक्टर वारंवार सांगत आहेत. कारण कोरोनाचे विषाणू हात ,नाक ,तोंडावाटे घशात जाण्याची शक्यता जास्त आहे.प्रत्येक नमाज पूर्वी याच पद्धतीने शरीराच्या या नाजूक व महत्त्वाच्या अवयवांची स्वच्छता केली जाते. यामध्ये तीनवेळा हात धुतले जातात, तीनवेळा तोंड धुतले जाते, तीनवेळा नाकात पाणी टाकून धुतले जाते, घोट्यापासून खाली पाय धुतले जातात. दिवसातून पाच वेळा अशी स्वच्छता केल्यानंतर शरीराच्या या सर्व भागावर कोणत्याही प्रकारचे विषाणू राहत नाही. म्हणजे कोरोना च्या निमित्ताने आज जे वैद्यकशास्त्र सांगत आहे तीच गोष्ट साडे चौदाशे वर्षांपूर्वी हजरत पैगंबरांनी सांगून ठेवलेली आहे.

कोरोनासारखे अनेक व्हायरस आपल्या अवतीभवतीअसतात. स्वच्छतेमुळे असे विषाणू नाश पावतात. म्हणून प्रत्येक वेळी प्रत्येकाने स्वच्छता अंगीकारली पाहिजे. नुसतं आपलं शरीर नव्हे तर आपला परिसर, आपण राहतो तो परिसर, आपण काम करतो तो परिसर, जिथे आपण वावरतो तो सर्व परिसर नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. त्याने विषाणूंचा प्रसार न होता विविधआजारापासून मुक्ती मिळते. मुळात सर्व प्रकारचे प्रदूषण वाढीस लावण्याचं काम मानवजातच करीत असते. गेल्या महिनाभराच्या लॉकडाऊन मुळे वातावरण, रस्ते, नद्या आणि निसर्ग खूपच स्वच्छ झाला आहे. गाड्या बंद असल्यामुळे हवेतील प्रदूषण बंद आहे. पर्यटन बंद असल्यामुळे नैसर्गिक वातावरणातही स्वच्छता आहे. माणूस घरात असल्याने बाहेरची घाण कमी झाली आहे. तात्पर्य म्हणजे प्रदूषण पसरवणारा घटक म्हणजे माणूस. हे समीकरण आता उघड झाले आहे.

 वजू मुळे केवळ शरीर स्वच्छ राहत नाही तर आंतरिक मनात सुद्धा शुद्धतेची भावना निर्माण होऊन माणूस वाईट विचारांपासून अलिप्त राहतो. पाच वेळा नमाज पठण करणारी व्यक्ती कधीच वाईट मार्गाला जात नाही. म्हणून अल्लाहताला ने सदाचारा साठी नमाज निश्चित केली आणि नमाज पठण करण्यासाठी वजू अनिवार्य केले.प्रत्येक धर्माच्या ज्या चाली,रिती, परंपरा निर्माण झाल्या आहेत, त्यामागं अशी अनेक कारणे आहेत. कोरोनासारखे आजारापासून मुक्त राहण्यासाठी वजू करणे आवश्यक आहे.(क्रमशः )
*सलीमखान पठाण*
*9226408082*

*महाराष्ट्र पोलिसांचे कार्य मानवतावादी -मुफ्ती रिजवान*



*महाराष्ट्र पोलिसांचे कार्य मानवतावादी -मुफ्ती रिजवान*

*उम्मती फाउंडेशन तर्फे मास्क व सॅनिटायझरचे वितरण*

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) समस्त मानव जातीवर कोरोना विषाणू संसर्गाचे संकट आले असून या आणीबाणीच्या स्थितीतही महाराष्ट्र पोलीस जीवाची पर्वा न करता कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करीत आहेत. जनतेच्या रक्षणासाठी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी रात्रंदिवस राबून पोलिस प्रशासन करीत आहे . या संसर्गाचा धोका ओळखून ही प्रत्येकजण राबत आहे. पोलिसांमध्ये सुद्धा सहृदय माणूस असतो याची उदाहरणे या निमित्ताने राज्यभरात अनेक ठिकाणी पाहायला मिळाली .हे अस्मानी संकट असून यासाठी सर्वांनी मिळून प्रार्थना करूया त्याचबरोबर पोलिस प्रशासनाकडून  मिळणाऱ्या  आदेशाचेही पालन करून पोलिसांना सहकार्य करू या असे प्रतिपादन मुफ्ती मोहम्मद रिजवानुल हसन साहब यांनी केले . 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊन मध्ये ठीक ठिकाणी आपले कर्तव्य अहोरात्र पार पाडणाऱ्या पुरुष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांना उम्मती फाउंडेशन' चे अध्यक्ष सोहेल बारुदवाला यांचेतर्फे सॅनिटायझर, मास्क व अल्पोपहाराचे वाटप मौलाना आझाद चौक तसेच बेलापूर रोडवरील चौकात करण्यात आले .त्या प्रसंगी मुफ्ती रिजवान यांनी आपले विचार व्यक्त केले .श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व मुफ्ती रिजवान साहब यांच्या मार्गदर्शना ज्येष्ठ नगरसेवक मुजफ्फर शेख, पत्रकार सलीमखान पठाण, हाजी जलीलभाई काझी यांच्या हस्ते सर्व पोलिसांना हे साहित्य वितरण करण्यात आले. जनतेच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असताना पोलिसांनी स्वतःच्या सुरक्षेच्यादृष्टीनेही योग्य ती दक्षता घ्यावी, अशा सूचना यावेळी उपस्थितांनी केल्या. समाजाचा व प्रशासकीय यंत्रणेतील महत्त्वाचा घटक हा पोलीस आहे. त्यांनी स्वत:चे आरोग्य सांभाळून इतरांच्या आरोग्यासाठी ही लढाई लढायची आहे. याकरिता प्रत्येकाने योग्य ती दक्षता घ्यावी. असे आवाहन ही मुफ्ती रिजवान साहब यांनी केले . हेड कांस्टेबल जोसेफ साळवे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांचा यावेळी उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला .सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उंमती फाउंडेशनचे अध्यक्ष सोहेल बारूदवाला,डॉक्टर तोफिक शेख, फिरोज पठाण, युसुफ लाखानी,शाकीब पठाण, वसीम जहागिरदार, निरज शाह, माजिद मिर्झा, अलीम बागवान, शाहरुख बागवान, मोहसिन बागवान आदींनी विशेष परिश्रम घेतले .

कामगार दिन - देश तरक्की की रक्त वाहिनी ड्राइवर शापित कामगार !



शापित कामगार देश की रक्त वाहिनी ड्राइव्हर, देश के तरक्की के लिए वरदान है! क्या किसको हो सकता भला इनकार है ?


          १ मे दुनियाभर में जागतिक कामगारदिन मनाया जाता है.जब औद्योगिक क्रांति का आगाज हुआ,तो मजदूर एक जरूरत बडी जरूरत बनने लगी थी.जैसे जैसे औद्योगिक क्षेत्रों में तरक्की होने लगी मजदूरो की भी जरूरत कारखानदारो को पडने लगी. औद्योगिक क्रांति के बाद कारखानदारी बड़ी साथ ही रोजनदारी भी बढने लगी. मजदूरों से कम दाम में १२घंटे या  १४ घंटे काम लिया जाने लगा.काम के आठ घंटे का किया जाये,रातमें और खतरोसे भरे कामो के लिए खास नियम बनाये जाये. काम के दाम नगद चाहिये, बाल मजदूरो पर पाबंदी हो,महिला मजदूर के कामोपर मर्यादा हो,हफ्ते की छुट्टी दी जाये.कारखानेदार मजदूरों की मांगें मानने को तैयार नही थे.इसीकारण मज़दूरोने बड़े आंदोलन खड़े कर दिये थे,.जिसमे अपने प्राणों की आहुति भी कई मज़दूरोने दी थी.मजदूर संघटनो ने दो आंतरराष्ट्रीय सम्मेलन लिए.१८९१ से १ मे आंतरराष्ट्रीय मजदूर दिन दुनिया के अलग अलग देशों में मनाया जाने लगा.भारत देशमें १ मे १९२३ से मजदूर दिन मनाया जाने लगा.साथ ही केरल और महाराष्ट्रमें ईन राज्योके निर्मिती के कारण केरला दिन और महाराष्ट्र दिनभी मनाया जाता है.
           हम हमारे देश के मजदूरों में ख़ासकर ड्राईवर की गर बात करे तो,जो देश के लिए रक्तवाहिनियों की तरह हो कर भी शापित सा क्यों है ? ये सवाल मन मे घर कर जाता है.औद्योगिक क्षेत्रमे ट्रांसपोर्ट सबसे अहम बात होती है और ट्रांसपोटेशन की रूह असल मे ड्राइवर ही होता है.ट्रांसपोर्ट में अंतर (डिस्टेन्स) और वक्त (टाइम) की कोई लिमिट ड्राइवर की नोकरी में नही होता.ड्राइवर के काम दिनरात और खतरोसे भरे होते है.देशमे औद्योगिकक्षेत्र नित नयी देशी विदेशी कंपनीयों पिछले कई दशकोसे बढी है.स्वाभाविक है कि ट्रांस्पोर्टटेशन भी बडा है,तो ड्राइवर पेशेकी जरुरत भी बड़ी है.इनसब के बावजूद ड्राइवरों की हालात हालातभरे ही है.इस बात से कोई इनकार नही करता.
          मुझे याद है, एक रोज मै हमारे शहर से बाहर इंद्रायणी होटल के पास  नींम के छाव में खड़ा हुआ था,सामने ही हाई वे पर  मोटरसाइकिल पर सवार दो नवजवानोंने ट्रकवाले को रोका और ट्रक के गुसकर मारने लगे. मै दूर से देख रहा था.बात समझमे नही आयी.साथ ही मैं शहर की तरफ निकल पड़ा.लगभग दो घंटे के बाद में चांदनी चौक में वही नवजवान उसी मोटरसाइकिल पर फिर एक ट्रकवालेको रास्ते के साइड में  रोककर ट्रक में चढते दिखायी दिये.

           मेरे मनमें शंका जागी. मैंने ट्रक का नंबर देखा, तो राजस्थान की ट्रक थी. मोटर -साइकिल पर नजर डाली तो नंबरप्लेट हाथसे टेडी करी हूई थी.ट्रक के केबिन के जा कर मैंने आवाज लगाई,देखा तो ड्राइवर को वो मार रहे थे और दो हजार रुपये की मोटर -साइकिल के नुकसान की मांग कर रहे थे.मेरी आवाज सुन नीचे उतरे और मुझसे कहने लगे,देखो चाचा इस ट्रकवाले टक्कर मारी,सुनते ही मैंने नवजवानों को दो दो झापडे जड़ डाली. यह याद दिलाकर के कुछ देर पहले इंद्रायणी होटल के सामने हाइवे पर भी ट्रक ड्राइवर को लूटा और यहाभी लूट रहे हो.बात अब के बड़ी अजीब थी.चौक में ट्राफिक पुलिस थी, रहदारी भी थी और ट्रक ड्राइवर की लूट हो रही थी.किसको खबर तक नही थी. ये इत्तेफाक ही था कि, मेरी दोनो वक्त नजर पडी. ऐसा रोज कई बार ड्राइवरो की लूट होती है, और मार भी खानी पड़ती है.
पुलिस और ड्राइवर के रिश्ते के किस्से यूनिवर्सिटी में इस सबजेक्ट को लेकर पीएचडी की जा सकती है. रास्ते पर बहोत ट्राफिक लगभग जाम थी.जिसमे एक लोडिंग ट्रक ट्राफिक पुलिस को दिखायी दिया. इनती सारी भीड़ में उसे रास्ते से बाजू रुकवाने को इशारे सीटियाँ फूक फूंककर करने लगा.ट्राफिक से ट्रक बाहर निकालना मुश्किल था.इसलिए ट्रक ड्राइवर धीरे धीरे ट्रक को आगे लिए जा रहा था.ताके ट्राफिक और जाम ना हो जाये.साथ ही चढान के वजह से ट्रक को रुकना ना मुमकीन था.ये मैं इसलिए जानता क्योंकि ट्रक के पीछे मैं भी ट्राफिक ने फंसा हुआ था.लगभग आधा किलोमीटर पर जाकर ट्रक ड्राइवरने रास्ते के साइड में लेकर ट्रक रुकवाई और ग़ुस्सेमे आकार बिना किसी सोंचे समझे हाथ के दंडे से ताकत से ट्रक के रग्गिल कांच (आसानीसे न फुटनेवाली) पर मारा के ट्रक की कांच टूट गयी. क्या कसूर था ट्रक ड्राइवर का ? रास्तेपर जब तक स्टेरिंग पर बैठा होता है.हर घटना का जिम्मेदार होता है.शिकायत किससे करे थानेदार के नजरमें भी गुनाहगार ड्राइवर ही होता है.
          एक हादसा ये भी हुआ था.सतरा साल का लड़का रात मोटरसाइकिल स्पीड अनकंट्रोलOOOOOO होनेपर डिवाइडर से टकराकर उछलकर दूसरे साइड गिर पड़ा सामने से आनेवाली ट्रक के निचे कुचल पड़ा. भिड़ने ट्रक को आग लगाई और ड्राइवर को मार डाला.अतिश्रम ड्रायविंग में ऑक्सीडेंट में जान चलीO जाती है, तब ये देखता और सुनता हूँ,तो ट्रक मालिक की हमदर्दी भी मिलती शिवाय इल्जाम के घरवाली बेवा होती है और बच्चे यतीम होते है. असंगठित होने के कारण ना कोई फंड, ना, ग्रजयूटी, विमा के लिए कई पापड़ बेलने पड़ते है.अपाहिज होने पर सिवाय ऊपरवाले के कोई मददगार नही होता.
बहोत बार ड्राइवर पेशेसे बाहर निकलने की कोशिश करता,एक्के दुक्के निकल जाते है.लेकिन बहोत सारोको बढ़ती बेरोजगारी की मजबूरी के कारण फिरसे स्टेरिंग पर बैठना पड़ता. शापित ड्राइवर को इसलिए कहना पड़ता है. गाँव से लेकर शहर तक देशभर में सबसे ज्यादा तादाद उन्ही की है.और सबसे ज्यादा पीड़ित पेशा ड्राइवर का है.
यही शापित पेशा देश के तरक्की के लिए हम सब के लिए वरदान भी है. देश के हर घरमे  बेटा, भाई, बाप,चाचा, मामा कोई ना कोई करीबी रिश्तेदार ड्राईवर है, फिर भी हम कहा कद्रदान है.
देश के सारे ड्राइवरों को न्यूज व्हलुज का कामगार दिन पर सलाम हैं और ढेर सारे  हार्दिक हार्दिक शुभेच्छा


अफजल सय्यद,
एडिटर,न्यूज व्हलुज