Saturday, May 2, 2020

लॉकडाउन मुळे घरात पैश्या ची चनचन, त्यात दारुचे दुकान आणि पान टपरी सुरु करण्याचा सरकारचा निर्णय...



 लॉकडाउन मुळे घरात पैश्या ची चनचन, त्यात दारुचे  दुकान आणि पान टपरी सुरु करण्याचा सरकारचा  निर्णय...

दारुचे दुकान आणि पान टपरी सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकार मार्फत घेण्यात आला.ग्रीन झोन साठी लागू आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार वाईन्स शॉपना परवानगी देण्यात आली आहे. मात्र ग्रीन झोनमध्येच ही परवानगी असणार आहे. तसेच वाईन्समधून खरेदी करण्या साठी काही नियमावली घालून दिली आहे. दुकानात एकावेळी फक्त ५ लोकांनाच उभे राहण्याची परवानगी असेल. तसेच दोन गिऱ्हाईकांमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवावे लागणार आहे.
दरम्यान मॉल्स आणि मार्केटिंग कॉम्प्लेक्स मधील वाईन्स शॉप्सना परवानगी देण्यात आलेली नाही. त्या व्यतिरीक्त इतर ठिकाणी असलेल्या दुकांना परवानगी देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊन आता १७ मे पर्यंत वाढवले असले तरी यादरम्यान ग्रीन झोन असलेल्या ठिकाणी ही दुकाने चालू करता येणार आहेत.
ग्रीन झोन मध्ये रोजगार पूर्वत करण्यात यावे.लॉकडाउन नागरिकांची आर्थिक परिस्थिति डाउन झालेली आहे.त्यात सरकारचा निर्णय हा प्रपंचासाथी विशेषता महिलासाठी त्रासदायक ठरणार आहे. नजदीक च्या काळात शाळाही उघडनार आहे.या साथी लागणाऱ्या खर्च ही मोठी चिंताजनक बाब आहे,असा सुर पालकातुन निघत आहे.

No comments:

Post a Comment