Saturday, May 2, 2020

प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीनेशहरातील रिक्षा चालकांसाठी किराण्याची मदत






प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीनेशहरातील रिक्षा चालकांसाठी किराण्याची मदत


लॉक डाऊन काळात रिक्षाचालकांना सोसावे लागत आहे मरण यातना  

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉक डाऊनला दिड महिना उलटून जात असताना रिक्षांची चाके जागेवरच थांबलेली आहेत. दररोजची कमाई मिळवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या शहरातील रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली असताना प्रेरणा प्रतिष्ठानने रिक्षा चालकांच्या थांबलेल्या संसाराला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. नुकतेच प्रतिष्ठानच्या वतीने अहमदनगर जिल्हा ऑटो, रिक्षा व टॅक्सी चालक संघटनेच्या सदस्यांना किराणा साहित्याचे वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, सल्लागार विलास कराळे, दत्ता वामन, अशोक औशिकर, लतीफ शेख, रावसाहेब काळे, रवींद्र वाबळे, अशोक कारळे, राहुल गोरे, राजेंद्र टिपरे, मुन्ना शेख आदिंसह रिक्षाचालक उपस्थित होते.
शहरात निम्म्याहून अधिक रिक्षा कर्जावर नवीन घेण्यात आल्या आहेत. लॉक डाऊनमुळे रिक्षांचा अत्यावश्यक सेवेत समावेश होत नसल्याने त्यांना बाहेर पडणे देखील मुश्कील झाले आहे. दररोज शहराच्या विविध भागात रिक्षा धावत असतात. मात्र कोरोनाच्या लॉक डाऊनचा काळ रिक्षाचालकांसाठी मरण यातना देणारा ठरत आहे. कर्जाचे हप्ते कसे फेडावे? हा गंभीर प्रश्‍न देखील त्यांना भेडसावत आहे. शिपवर (भाड्याने) दिवसभर रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा हाकणार्‍या चालकांच्या कुटुंबाची तर अत्यंत बिकट परस्थिती आहे. मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शहरातील रिक्षा चालकांना प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप करुन आधार देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment