Saturday, May 2, 2020

परराज्यातील ५० प्रवासी त्यांच्या गावाकडे रवाना




परराज्यातील ५० प्रवासी त्यांच्या गावाकडे रवाना
*आपुलकीने सांभाळ केल्याबद्दल मानले प्रशासनाचे आभार

आज रात्री नगरहून राजस्थानसाठी प्रवासी बस रवाना करण्यात आली. लॉकडाउन काळात या बसेस मधील प्रवासी विनापरवाना जात असताना५० व्यक्तींना ताब्यात घेऊन निवारा गृहात दाखल करण्यात आले होते. शहरातील बडी साजन ओस्वाल मंगल कार्यालय या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
आज त्यांना त्यांच्या घरी जाण्यास मिळणार असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाने अतिशय आपुलकीने काळजी घेतल्याबद्दल यंत्रणेतील प्रत्येकाचे त्यांनी आभार मानले.  

दिनांक २७ मार्च रोजी अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या भरारी पथकाच्या माध्यमातून कडप्पा, आंध्रप्रदेश येथून राजस्थान कडे जाणाऱ्या या 50 जणांना नगर मध्ये प्रवेश करतेवेळी ताब्यात घेण्यात आले होते. येथे त्यांची राहण्या-खाण्याची व इतर वैद्यकीय सुविधांची सोय करण्यात आली होती. बडी साजन ओसवाल श्री संघ व सकल राजस्थानी युवा मंच यांनी यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले. या नागरिकांना  आज राजस्थानमधील जालोर, बाडमेर या जिल्ह्यांमध्ये शासकीय नियमाप्रमाणे रवाना करण्यात आले. यामध्ये ४६  पुरुष व ०२ महिला तसेच ०२ लहान मुले आदी ५० जण होते. त्यांच्यासमवेत असलेल्या आंध्रप्रदेश येथील वाहनचालकांना उद्या, दिनांक ०३ मे रोजी सोडण्यात येणार आहे. त्याबरोबरच राजस्थानमधील करोली जिल्ह्यातील सुमारे 15 नागरिकांना रवाना करण्याची प्रक्रिया 3 मे रोजी संपन्न होणार आहे.     **

No comments:

Post a Comment