Monday, May 4, 2020

स्वयंसेवी संस्था, लोकसहभाग, प्रशासन, आणि कंपनी सि.एस.आर च्या माध्यमातून राबविलेला राज्यातील पहिलाच उपक्रम.





कमिन्स इंडिया चे आर्थिक योगदान व नवजीवन संस्थेच्या पुढाकाराने

स्वयंसेवी संस्था, लोकसहभाग, प्रशासन, आणि कंपनी सि.एस.आर च्या माध्यमातून राबविलेला राज्यातील पहिलाच उपक्रम.


नवजीवन ग्रामोदय प्रतिष्ठान हि संस्था १९९४ पासून नाबार्ड बँकेच्या आर्थिक सहकार्याने महाराष्ट्रामधील दुष्काळग्रस्त गावामध्ये पाणलोट क्षेत्र विकासासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प तसेच अनेक देणगीदार संस्था व शासनाच्या विविध विभागामार्फत प्रामुख्याने लोकसहभागातून, शिक्षण, आरोग्य, महिला बचत गटांमार्फत आर्थिक विकास  तसेच अनाथ, निराधार, निराश्रित, एक पालक व उसतोड कामगारांच्या मुलांसाठी बालकाश्रम चालवत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे उद्भवलेल्या गंभीर दुःखदायी परिस्थितीत संकटाला समाज सेवेची संधी मानून नवजीवन या संस्थेने पुढाकार घेऊन देवनाथ फाउंडेशन, मोहनराव गाडे सामाजिक प्रतिष्ठान तसेच स्थानिक दानशुरांच्या सहकार्याने पाथर्डी येथे दि.26.मार्च रोजी ‘चला करुया अन्नदान अभियानास’  सुरुवात केली.
पाथर्डी नंतर संस्थेने प्रहार संघटना, ‘वारी’ फौंडेशन, शब्दगंध साहित्यिक परिषद, मोहनराव गाडे सामाजिक प्रतिष्ठान, विश्वनिर्मल फौंडेशन, स्त्री शक्ती फौंडेशन, आधार संस्था  या संस्था-संघटनांना एकत्रित करून ‘अहमदनगर सोशल फेडरेशन’ या व्यासपिठाद्वारे कमिन्स इंडिया फौंडेशन च्या आर्थिक सहकार्याने दि.४ एप्रिल पासून नगर MIDC परिसरातील कंपन्या बंद पडल्याने बेरोजगार झालेले कामगार तसेच पोलिसांनी क्वरांटाइन करून ठेवलेले स्थलांतरित मजूर यांचेसाठी अन्नदान अभियान सुरु केले. या अभियानामध्ये शब्दगंध चे राजेंद्र उदागे यांनी सहभागी होऊन दररोज १५० ते २०० याप्रमाणे आजपर्यंत त्यांनी ३५६७ टिफिन दिले. तसेच प्रहार अकादमी व मधुबन ओर्गानिक चे संतोषभाऊ पवार यांनी दररोज १०० याप्रमाणे १८०० टिफिनचे मोठे योगदान दिले. तसेच सबरजिस्ट्रार संजय त्रिंबक साळवे यांनी ५०० टिफिन देऊन सहकार्य केले. याबरोबरच शहरातील ‘Helping Hands’ औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक स्वप्नील देशमुख व त्यांची टीम यांनीही अभियानास मोठा हातभार लावला.
पाथर्डी आणि नगर नंतर कर्जत तालुक्यातील दुष्काळी माहिजळगाव येथे संस्थेने या अभियानास सुरुवात करून आज अखेर १९०० गरजू लोकांना जेवण दिले.
अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक - कमिन्सचे विकास साळवे, आदित्य देसाई, अंजली मगर, संदीप क्षीरसागर, प्रशांत चितळे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक स्वप्नील देशमुख, नवजीवनचे डॉ.श्रीकांत तोडकर, जयेश कांबळे, सौ. अस्मिता साळवे, वारी संस्थेचे सुधीर लंके, देवनाथ फौंडेशनचे डॉ.ज्ञानेश्वर दराडे
अथक परिश्रम – प्रा. दिगंबर गाडे, प्रा.सुनील मरकड, भाग्येश शिंदे, बाळासाहेब चव्हाण, जीतेंद्र आढाव, रवींद्र वायकर, शेखलाल पठाण, प्रथम सोनवणे, राजेंद्र मारकंडे, संपतराव रोहोकले, राजेंद्र भोसले, सुदाम लगड, रवींद्र पवार, संपतराव रोहोकले, सुनील गोसावी
नवजीवन वॉरीयर्सची कामगिरी –
१. प्रा.दिगंबर गाडे - शहारापासून अतीदुर्गम, ज्यांच्या पर्यंत कोणत्याही प्रकारची मदत अद्याप पोहोचलेली नाही अशा खेड्यांतील दुर्लक्षित घटकांपर्यंत जाऊन त्यांना अन्नदानाबरोबरच आपल्या जवळ लहान मुलांसाठी चॉकलेट, बिस्किट व खाऊ देत जमलेल्या लोकांना परिसर स्वछता, आरोग्य, शिक्षण, अंधश्रद्धा या विषयी मार्गदर्शन करत आहेत. आजपर्यंत पाथर्डी तालुक्यातील 25 गावांमधील वंचित कुटुंबांपर्यंत  ते पोहोचले आहेत.

२. डॉ.जयेश कांबळे – कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथील गरजवंतापर्यंत अन्नदान करण्याबरोबरच लॉकडाऊन मुळे मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या व्यसनाधीन व्यक्तींचे प्रबोधन करत आहेत.
३. डॉ.श्रीकांत तोडकर – मंत्रालयातील अधिकारी असल्याने आपले नेट्वर्किंग व कार्यकुशलतेचे कौशल्य वापरून सर्व स्वयंसेवकांना या कोरोना युद्धात लढण्यासाठी मानसिक आधार व आर्थिक पाठबळ देतात.
४. राजेंद्र उदागे -  शब्दगंध साहित्यिक परिषद, अहमदनगर केटरर्स, नवजीवन प्रतिष्ठान तसेच जिल्ह्यातील अनेक संस्थांचे पदाधिकारी असलेले राजूभाऊ उदागे  या उपक्रमाविषयी बोलताना म्हणाले कि, हा अन्नदान उपक्रम सध्याच्या गंभीर व अडचणीच्या काळात खरोखरच स्तुत्य आहे. या उपक्रमामुळे मला अनेक भुकेलेल्यापर्यंत पोहोचता आले याचे समाधान आहे. या पुढील काळात मी अहमदनगर सोशल फेडरेशन सोबत कार्य करत राहील.
५. संतोष पवार – मुळचे जामखेड येथील राहिवासी व  सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणारे, जिल्ह्यात व राज्यभरात प्रहार संघटनेच्या माध्यमातून अन्याय अत्याचार्याच्या विरोधात खंबीरपणे लढा देणारे मा.संतोषभाऊ पवार या उपक्रमाविषयी म्हणाले कि, अहमदनगर सोशल फेडरेशन च्या माध्यमातून मला या अन्नदान उपक्रमात सहभागी होऊन गरिबांची सेवा करता आली.
पाथर्डी येथे 3792, नगर येथे ११,७३४, माहिजळगाव येथे १९०० असे एकूण १७,४२६ गरजवंतापर्यंत जेवन पोहोचले असल्याचे सांगून कोरोनाशी लढता लढता कोरोनाच्या विषाणूबरोबर जगायला शिकले पाहिजे असे नवजीवनचे राजेंद्र पवार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment