Friday, May 1, 2020

पुस्तक चाळताना.....



पुस्तक चाळताना.....

आज हातात एक २००४ चे एक विशेषांक हाती आले,पाने चाळताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेला 'धाकटा भाऊ' या लेखातील चौकटी वर गेली.
             जेम्स बॉन्ड, मी आणि राजा
राज्यात शिवसेना - भाजपाच सरकार असताना मला आणि राजाला चांगलीच सिक्युरिटी होती.बऱ्याच दिवासात जेम्स बॉन्डचा पिक्चर आम्ही दोघांनी बघितला नव्हता आणि योगायोगने तो बान्द्रयालाच एका टॉकीज मध्ये लागला. मी आणि राजा दोघेही तो बघायला गेलो.सुरक्षाव्यवस्थे मुळे थिएटर सार रिकाम होत. आम्ही सीटवर जाऊन बसलो. पिक्चर सुरु झाला आणि नंतर पब्लिकला थिएटर मध्ये सोडायला सुरवात झाली.थिएटर मध्ये पोहचायाच्या आत सिनेमा सुरु झाल्याच पाहुन पब्लिक वैतागल.आरडाओरड सुरु झाली.शिटया वाजु लागल्या, जेम्स बॉन्डचा पिक्चर म्हणजे सुरु झाला.शिटया वाजु लागल्या जेम्स बॉन्डचा पिक्चर म्हणजे सुरवात कधी चुकवू नका आणि शेवट कोणाला सांगू नका. अस जाहिरातीच म्हटलेल असत.मग लोकाग्रहास्तव लोकांना पुन्हा पहिल्यापासून पिक्चर दाखवण थिएटर मालकाला भाग पडले आणि आम्हा दोघांनी जेम्स बॉन्डची सुरवात बघायचा आनंद दोनदा लूटला!"

न्यूज व्हलुज

No comments:

Post a Comment